गुरुवार, ११ डिसेंबर, २०२५

ताडोबा – अंधारी राष्ट्रीय उद्यान अभयारण्य चंद्रपूर महाराष्ट्र Tadoba andhari rastriy udyan abhyarany chndrapur maharashtra

 ताडोबा – अंधारी राष्ट्रीय उद्यान अभयारण्य चंद्रपूर महाराष्ट्र

Tadoba andhari rastriy udyan abhyarany chndrapur maharashtra

ताडोबा – अंधारी राष्ट्रीय उद्यान अभयारण्य चंद्रपूर महाराष्ट्र  Tadoba andhari rastriy udyan abhyarany chndrapur maharashtra

• स्थान :

 महाराष्ट्र राज्यातील विदर्भ विभागात चंद्रपूर जिल्ह्यात असणारे अंधारी नदीच्या उगम भागात आपणास ताडोबा अभयारण्य पहायला मिळते.

• अभयारण्याचे क्षेत्रफळ :

• ताडोबा अंधारी अभयारण्याचे दोन भाग पडतात.

• ताडोबा अंधारी कोअर झोन क्षेत्रफळ : ६२५.४० चौ. किलोमीटर.

• ताडोबा अंधारी बफर झोन क्षेत्रफळ : ११०० चौ. किलोमीटर

• ऐकून क्षेत्रफळ : १७२५.४० चौ. किलोमीटर.

ताडोबा – अंधारी राष्ट्रीय उद्यान अभयारण्य चंद्रपूर महाराष्ट्र  Tadoba andhari rastriy udyan abhyarany chndrapur maharashtra

अभयारण्य पहायला जाण्यासाठी प्रवासी मार्ग :

• नागपूर या आंतरराष्ट्रीय विमानतळापासून १४० किलोमीटर अंतरावर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे.

• चंद्रपूर येथून बसने ४५ किलोमीटर अंतरावर ताडोबा अभयारण्य आहे.

• चिमूर येथून ३२ किलोमीटर अंतरावर ताडोबा अभयारण्य आहे.

• चंद्रपूर हे ठिकाण जिल्हा ठिकाण असून ते रेल्वे व रस्त्याने देशातील इतर ठिकाणांना जोडलेले आहे.

ताडोबा – अंधारी राष्ट्रीय उद्यान अभयारण्य चंद्रपूर महाराष्ट्र  Tadoba andhari rastriy udyan abhyarany chndrapur maharashtra

ताडोबा अभयारण्याची स्थानीक माहिती :

• वनस्पती जीवन :

महाराष्ट्र राज्यातील विदर्भ विभागात ताडोबा अभयारण्य येते. येथील वातावरण उष्ण असल्याने. येथील वृक्षांमध्ये दक्षिण उष्ण कटिबंधीय पानझडी अरण्ये प्रकारातील वृक्ष येथे आढळतात. विशेषत ‘ मोह, धावडा, आपटा, बेहडा, खैर, बिब्बा , शिसम, तेंदूपत्ता, सागवान, ऐन, बांबू या वनस्पती विशेषत आढळून येतात. या झाडांची ठराविक ऋतूत म्हणजे शिशिरात ( हिवाळा व उन्हाळा यांचा संक्रमण काळ ) या काळात पानगळ होते. तसेच आंबा, जांभूळ, अर्जुन हे देखील वृक्ष आढळतात. जे सदाहरित असतात. तसेच मगरीच्या अंगावर खवल्या सारखे दिसणारे झाड म्हणजे क्रोकोडाईल ट्री देखिल इथे पहायला मिळते. त्याचप्रमाणे रात्रीचे भूता प्रमाणे भास होणारे घोस्ट ट्री देखिल इथे पहायला मिळतो. नवीन वनीकरण करताना अधून मधून मोकळी जागा ठेवलेली आहे. जी फायर झोन म्हणून ओळखली जाते. जंगलाला आग लागल्यास ती सर्वत्र पसरू नये. म्हणून काळजी घेतल्याचे दिसते. या जंगलातून आपणास बांबू, इमारत लाकूड, औषधे व तेंदूपत्ते यासारखे उत्पन्न वन विभागाकडून घेतले जाते.

• जलव्यवस्थापन :

ताडोबा – अंधारी राष्ट्रीय उद्यान अभयारण्य चंद्रपूर महाराष्ट्र  Tadoba andhari rastriy udyan abhyarany chndrapur maharashtra

अंधारी नदी :

या अभयारण्याची मुख्य जीवनदायीनी आहे. पूर्वी या ठिकाणी घनदाट अरण्य होते. की सूर्याची किरणे दिवसाही जमिनीस स्पर्श करीत नसत. सर्वत्र अंधार असे म्हणून या नदीस अंधारी नदी असे नाव पडले. अशी अख्यायिका ऐकिवात आहे.

ताडोबा :

ताडोबा – अंधारी राष्ट्रीय उद्यान अभयारण्य चंद्रपूर महाराष्ट्र  Tadoba andhari rastriy udyan abhyarany chndrapur maharashtra

 ताडोबा येथील मुख्य तलाव असून या तलावात मोठ्या प्रमाणात पाणी असते. या तलावा वरूनच या अभयारण्यास ताडोबा हे नाव पडले.

• तसेच येथे वाघडोह, मोहाचा खड्डा, आंबे डोह, जामून झोरा, सांबर डोह, वसंत बांध, काटेझरी, उमरीचा फाटा, काळा आंबा तेल्याताड असे अनेक लहान मोठे पाणवठे पहायला मिळतात. या पाणवठ्याद्वारे येथील जंगली प्राण्यांची पिण्याच्या पाण्याची गरज भागवली जाते. तसेच उन्हाळ्यात पाणवठे आठल्यावर पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू नये म्हणून वन विभागाने जागोजागी कृत्रिम पाणवठे बोअर वेल मारून त्यावर सौर ऊर्जेचे पंप बसवून निर्माण केले आहेत. जे उन्हाळ्यात प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची सोय करतात.

• प्राणी जीवन :

• वाघ, बिबट्या, अस्वल, जंगली कुत्रे म्हणजेच ढोले, आणि गवा येथील बिग फाईव्ह म्हणून ओळखले जातात. तसेच काळवीट, हरणे, रानडुक्कर, साळिंदर, भेकर ,उदमांजर, लांडगे, मुंगूस, घोरपड, चितळ, नीलगाय व पिसुरी हरणे देखील येथे पाहायला मिळतात.

• वाघ :

या अभयारण्यातील महत्वाचा प्राणी आहे. रॉयल बंगाली टायगर म्हणून ओळखला जातो. दरवर्षी वाघांची जनगणना केली जाते. प्रत्येक वाघाचे क्षेत्र ठरलेले असते. वाघाचे क्षेत्र हे ४० ते ४५ चौ. कि. मी. तर वाघिणीचे क्षेत्र हे ११ ते १२ कि. मी. असते. एक वाघ दुसऱ्या वाघाच्या तसेच एक वाघीण दुसऱ्या वाघिणीच्या क्षेत्रात गेल्यास त्यांमध्ये झगडा होतो. प्रत्येक क्षेत्रात झाडावर तसेच दगडावर वाघ, वाघीण आपल्या पंजाचे ठसे नखांनी ओरबाडून निशाने तयार करते. तसेच मूत्रविसर्जन करुन खुणा करते. उन्हाळ्यात पाणवठ्यात मस्त लोळताना आपणास वाघांचे दर्शन घडते. पाणवठे, सुरक्षित जंगल व पोटभर अन्न यामुळे येथील वाघांची संख्या वाढताना दिसून येते. वाघांची गणती करण्यासाठी येथे खास अमेरिकन वाईल्ड लाईफ कोंझरवेशन सोसायटी या संस्थेच्या मदतीने सेन्सर्स व कॅमेरे बसवले. याच्या मदतीने वाघांची गणती केली जाते. वाघांचे ठसे, अंगावरील पट्टे, याद्वारे त्यांची शिरगणती केली जाते. दोन वाघांच्या पाठीवरील पट्यात साम्य नसते. येथील तेल्या ताड या तलावापरिसरात टायगर सिस्टर्स ऑफ तेलिया ही डॉक्युमेंट्री फिल्म बनवली आहे.

ताडोबा – अंधारी राष्ट्रीय उद्यान अभयारण्य चंद्रपूर महाराष्ट्र  Tadoba andhari rastriy udyan abhyarany chndrapur maharashtra

• रानगवे :

ताडोबा – अंधारी राष्ट्रीय उद्यान अभयारण्य चंद्रपूर महाराष्ट्र  Tadoba andhari rastriy udyan abhyarany chndrapur maharashtra

पाणवठे व भरपूर वन गवत यामुळे येथे जंगली म्हैस म्हणजेच गव्यांचे कळप पहायला मिळतात. धिप्पाड, काळसर रंग टोकदार शिंगे असणारा वजनदार गवा येथील अरण्यात पहायला मिळतो.

• हरणे :

सुंदर काळवीट व पिवळसर रंगाची सुंदर ठिपके असलेली हरणे यांची संख्या बहुसंख्य आहे. जे वाघांचे खाद्य आहेत. एखादे हरिण शिकार केल्यावर वाघ त्याचा मासल भाग खाऊन शिंगे व हाडे टाकून देतो. त्या शिंगांत कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते. ते कुरतडून खाण्याचे काम जंगली साळिंदर करते. हा एक प्रकारे अन्न साखळीचाच भाग आहे.

• जंगली कुत्रे :

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात आपणास जंगली कुत्र्यांचे कळप आढळतात. जे हरणे, डुक्कर यांची शिकार करून खातात.

• बिबट्याचा संचार येथे विशेषत रात्रीच्या अंधारात असतो. त्यामुळे ते दृष्टीस कमी पडतात.

• अस्वल :

अरण्यात अस्वल असून येथील झाडांवरील फळे, मध व लहान प्राणी यांची शिकार करण्यात ती पटाईत असतात.

• मगर :

ताडोबा – अंधारी राष्ट्रीय उद्यान अभयारण्य चंद्रपूर महाराष्ट्र  Tadoba andhari rastriy udyan abhyarany chndrapur maharashtra

वाघानंतर मगर हा विशेषत येथील तलावात व पाणथळ जागी आढळणारा प्राणी आहे.

• पक्षी जीवन :

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात सफर करताना आपल्याला निरनिराळे स्थानिक व स्थलांतरित असे ३०० च्या वर पक्षी आपणास पाहायला मिळतात. बगळे, धनेश, रानकोंबड्या, करकोचे, खंड्या, मोर, भारद्वाज, मच्छीमार करणारा डोमकावळा तसेच विशिष्ट ऋतूत आढळणारे निरनिराळे पक्षी येथे आढळतात.

• ताडोबा हे नाव का पडले?

ताडोबा – अंधारी राष्ट्रीय उद्यान अभयारण्य चंद्रपूर महाराष्ट्र  Tadoba andhari rastriy udyan abhyarany chndrapur maharashtra

पूर्वी पासून या परिसरात गोंड ही आदिवासी जमात येथे राहते. अनेक गोंड राजे शिकार करण्यासाठी या जंगलात येत असत. एक अख्यायिका अशी आहे की येथे पूर्वी तारू नावाचा एक आदिवासी युवक येथे होऊन गेला. तो अत्यंत धाडशी होता. तो जंगली प्राण्यापासून आपल्या लोकांचं रक्षण करण्यास सदैव तत्पर असे. वाघाच्या डोळ्यात डोळा देऊन तो झुंज करी. अरण्यात धाडशी कामे करी. जसे तेंडुपत्ते गोळा करणे, वनौषधी गोळा करणे, प्राण्यांची शिकार करणे, एके दिवशी वाघाशी सामना करताना तो मरण पावला. तेव्हा येथील तळ्याकाठी त्याचे अंतिम संस्कार करण्यात आले. तेथे आदिवासींनी पुढे देऊळ बांधले. व ते त्याची पूजा करू लागले. त्याच्या नावावरून येथील तलावास व अरण्यास ताडोबा हे नाव पडले. आजही दर पौष महिन्यात आदिवासी येथे यात्रा भरवतात. अन् उत्सव साजरा करतात.

ताडोबा – अंधारी राष्ट्रीय उद्यान अभयारण्य चंद्रपूर महाराष्ट्र  Tadoba andhari rastriy udyan abhyarany chndrapur maharashtra

किडे कीटक :

• या अभयारण्यात आपणास अनेक लहान मोठ्या जातीचे किडे कीटक पाहायला मिळतात. जवळ जवळ १७५ प्रकारच्या फुलपाखरांच्या प्रजाती पाहायला मिळतात.

• शिकारा किडा :

उन्हाळ्याच्या काळात येथे शिकारा किड्यांची पैदास होते. ज्यांचे आयुष्य काही काळ असते. त्यांची संपूर्ण वाढ झाल्यावर ते एक प्रकारे आवाज करू लागतात. त्यावेळी त्यांच्या शरीरातून पाणी गळू लागते. ते संपले की ते मरून जातात. त्यांच्या ओरडण्याने अरण्यात एक भयसूचक वातावरण निर्माण होते. अनेक पक्षांचं ते आवडत खाद्य आहे.

• गवत : या ठिकाणी अनेक गवताच्या प्रजाती पहायला मिळतात. जवळपास त्यांची संख्या ६० पेक्षा जास्त आहे.

• सरीसृप :

येथे मगर, साप, घोरपड असे वेगवेगळे ऐकूण ५४ प्रकारचे सरीसृप आढळतात.

• ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प पाहण्यासाठी व्यवस्था :

• अभयारण्य पहायला जाताना आपल्याला बफर झोनला १४ गेट तर कोअर झोनला ६ गेट असे ऐकूण २० गेट आहेत. येथून परवानगी पास घेऊन अरण्यात प्रवास करण्यासाठी परवानगी मिळते. फक्त २०% क्षेत्र निरीक्षण करण्यासाठी मुभा असते. गाभा क्षेत्रात आपण प्रवेश करू शकत नाही.

ताडोबा – अंधारी राष्ट्रीय उद्यान अभयारण्य चंद्रपूर महाराष्ट्र  Tadoba andhari rastriy udyan abhyarany chndrapur maharashtra

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पा विषयी ऐतिहासिक माहिती :

• इसवी सन १९५५ सालामध्ये ताडोबा राष्ट्रीय उद्यान म्हणून मान्यता दिली.

• इसवी सन १९८५ साली ताडोबा अंधारी अरण्ये एकत्र करून ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्प अभयारण्य म्हणून मान्यता दिली.

• इसवी सन २०१४ साली येथील जामनी, पांढरपोळ सारख्या आदिवासी गावांचे स्थलांतर अभयारण्य क्षेत्राबाहेर केले.

• सध्या इथे वनविभागामार्फत पर्यटन सुविधा दिली जाते.

ताडोबा – अंधारी राष्ट्रीय उद्यान अभयारण्य चंद्रपूर महाराष्ट्र  Tadoba andhari rastriy udyan abhyarany chndrapur maharashtra

अभयारण्य पहायला जाण्यासाठी नियम व अटी :

ताडोबा – अंधारी राष्ट्रीय उद्यान अभयारण्य चंद्रपूर महाराष्ट्र  Tadoba andhari rastriy udyan abhyarany chndrapur maharashtra

• अभयारण्य पहायला जाताना कोणत्याही प्लॅस्टिक वस्तू, कागद नेण्यास मनाई आहे.

• जाताना आपला मोबाईल फोन बंद करून जमा करावा लागतो. सेल्फी घेण्यास सक्त मनाई आहे.

• सफरीसाठी प्रवेश चार्ज घेतला जातो. ते तिकीट दाखवूनच आतमध्ये प्रवेश मिळतो.

• या ठिकाणी सफरीसाठी जिप्सी व कॅन्टर या दोन प्रकाराच्या गाड्यांना परवानगी आहे.

• सफर करताना वाहनातून खाली उतरू नये.

• प्राणी पाहून कोणताही आवाज करू नये. किंवा त्यांना त्रास होईल असे कृत्य करण्यास मनाई आहे.

• अभयारण्य परिसरात जाताना पिण्याच्या पाण्यासाठी काचेची बाटली विकत दिली जाते. प्लॅस्टिक बाटलीस बंदी आहे.

• अभयारण्य परिसरात धूम्रपान, मद्यपान करण्यास सक्त मनाई आहे.

• सफर करताना वन विभागाकडून एक गाईड व ड्राइव्हर दिला जातो. ते आपणास अरण्य सफर करण्यास मदत करतात.

• कॅमेरा, दुर्बीण नेण्यास परवानगी आहे. पण चार्जेस घेतले जातात.

• गेट जवळील दुकानातून आपण ते विकत अथवा भाड्याने घेऊ शकतो.

• मोहार्ली गेट तसेच इतर काही गेट पासून परिसरात अनेक उपहारगृहे, लॉज आहेत. तिथे आपल्या खाण्याची व जेवणाची, रहाण्याची व्यवस्था सोय होऊ शकते.

ताडोबा – अंधारी राष्ट्रीय उद्यान अभयारण्य चंद्रपूर महाराष्ट्र  Tadoba andhari rastriy udyan abhyarany chndrapur maharashtra

• अशी आहे ताडोबा अंधारी व्याघ्र अभयारण्याची माहिती

Tadoba andhari rastriy udyan abhyarany chndrapur

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

यह एक प्रायव्हेट वेबसाईट हैं l इसमें लिखी हुई जाणकारी के बारे में आप को आशंका हो तो सरकारी साईट को देखकर आप तसल्लई कर सकते हैं l

Vasai Fort (Bassein Fort) – Information in English

  Vasai Fort (Bassein Fort) – Information in English “Invincible fort Janjira, Vasai Fort too fought till unconsciousness, finally the front...