कुडे लेणी/ kude leni
स्थान :
महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यात रोहा तालुक्यात कुडा लेणी आहेत. इंदापूर पासून मुरुड जंजीरा मार्गावर आपल्याला कुडा लेणी फाटा लागतो. या फाट्याने आपण कुडा लेणी पाहायला जाऊ शकतो. येथे बेसाल्ट खडकात खोदलेली लेणी पाहायला मिळतात.
• लेणी समूह पाहायला जाण्यासाठी प्रवासी मार्ग :
• मुंबई गोवा महामार्गावर असलेल्या इंदापूर येथून १५ किलोमीटर अंतरावर कुडा लेणी आहेत.
• मुंबई – पेण – रोहा – तांबडी घोसाळे मार्गे – खजनानिवाडी येथून – मंदाड पुलावरून तळा मुरूड रोडने आपण कुडा लेणी पाहायला जाऊ शकतो.
• मुरूड जंजीरा ते कुडा २५ किलोमीटर अंतरावर आहे.
• लेणी समूहामध्ये पाहण्यासारखी स्थळे :
• कुडा लेणी फाट्याने थोडे पुढे आल्यावर दगडी पायरी मार्ग लागतो. या वाटेने आपण लेणी समूहाजवळ जाऊ शकतो. उंच डोंगरात असलेल्या बेसाल्ट खडकात. छन्नी हातोडा वापरून ही लेणी खोदलेली आहेत. ही लेणी इसवी सनाच्या पहिल्या ते तिसऱ्या शतकात खोदली गेली आहेत. या ठिकाणी वेगवेगळ्या लेणी मध्ये दिलेल्या दानाचे लिखित शिलालेख पहायला मिळतात. ही लेणी सातवाहन काळातील असून या परिसरात घाटी प्रदेश पुणे, सातारा विभागातून होणाऱ्या मुरूड जंजीरा परिसरातील राजापुरी खाडीतील जुने प्राचीन राज्य नगर मंदावस पुढे याच ठिकाणास मंदाड हे नाव पडले. येथून होणारा व्यापार जो रोम पर्यंत होत होता. या व्यापारी मार्गावर तत्कालीन राजाश्रय मिळालेल्या बुद्ध धर्मीय प्रसारक, व्यापारी, वाहतूक करणारे, माळी, सावकार, ब्राह्मण व बुद्ध धर्मीय शिष्य व उपासक यांनी तत्कालीन दिलेल्या दानाचा वापर करून कारागिरांकरवे ही लेणी खोदून घेतली आहेत.
• याठिकाणी ऐकूण २६ लेणी पहायला मिळतात.. लेणी क्रमांक १ ते १५ खालील बाजूस असून लेणी क्रमांक १६ ते २६ वरील बाजूस आहेत.
• लेणी क्रमांक एक :
हे एक भग्न लेणे आहे. बाहेरील भाग पडलेला आहे. बाहेरील स्तंभ भग्न झाले आहेत. बुद्ध धर्माचा प्रसार करणाऱ्या चारक भिक्षूंसाठी ही निवास व्यवस्था केलेली होती. यामध्ये आत शयन व बैठक आहे. विश्रांती, ध्यानधारणा करण्यासाठी या लेण्यांचा वापर केला जाई. येथे एक शिलालेख आहे. तत्कालीन विभाग प्रमुख ( महभोज) विजय नावाच्या अधिकारी स्त्रीच्या मुलाने सुलसदत्त, पत्नी उत्तरदत्ता, नातू शिवभूती व नातसून नंदा यांनी हे लेणे दान देऊन खोडवून घेतले आहे.
• लेणी क्रमांक २.३ :
ही देखील विहार आहेत. लहान गवाक्ष असणाऱ्या खोल्या व आत ध्यान व शयन कक्ष आहेत. येथील शिलालेख भग्न असून त्यावरील भूतिस लेणे या नावावरून ही देखील लेणी शिवभुती यांनी दान दिल्याचे समजते.
• लेणी क्रमांक ४ :
ही लेणी भग्न आहे, येथे अर्धवट विहार व चैत्य गृह आहे. बाहेर मंडप व आत विहार अशी ही लेणी आहेत.
• लेणी क्रमांक ५ :
येथे सुंदर भिक्षू निवास व बाहेरील बाजूस पाण्याची टाकी आहे. जीला पौडी म्हटले जात असे. भिक्षूंच्या पिण्याच्या, स्नानाच्या, जेवणाच्या व इतर कार्य करण्यासाठी या पौडीतील पाण्याचा वापर केला जाई. येथे देखील शिलालेख आहे. थोडा अस्पष्ट आहे. बुद्ध भिक्षू पातीमित्र व अग्नीमित्र यांची भगिनी नागनीका ही बुद्ध धर्मीय दीक्षा घेऊन अनुयायी झाली, यासाठी तिच्या मुलगीने देखील दीक्षा घेतली. म्हणून पद्मुनिका हिने तसेच अन्य शिष्या यांनी ही पौडी व भिक्षू निवास दान दिले आहे.
• लेणी क्रमांक ६ :
या लेणी बाहेरील स्तंभ भग्न झाले आहेत. त्यावर हत्ती शिल्प आहे. त्यानंतर व्हरांडा आहे. व्हरांड्यात बाहेरील बाजूस कठडा आहे. त्यावर नक्षी कोरलेली आहे. हत्ती शिल्पामागे बुद्ध प्रतिमा कोरलेली आहे. बुद्ध मूर्ती भावना धम्मचक्र प्रवर्तन अवस्थेत असून. बाजूला पद्मपाणी, वज्रपाणी यांची शिल्पे कोरलेली आहेत. बुद्ध कमलपुष्पात बसलेले खाली नाग राजांनी व त्याचे कुटुंब व प्रजा यांनी हातात कमलपुष्प धरलेले आहे. सातवाहन हे नागवंशी मानले जातात. त्यांनी बुद्ध धर्मास राज्यसत्तेच्या शिरी घेतल्याचे ते प्रतिक आहे. बाहेरील व्हरांड्यात देखील बुद्ध, हरीण शिल्पे आहेत. आतील बाजूस विस्तृत आवार आहे. आतील भिंतीवर देखील बुद्ध प्रतिमा आहेत. यामध्ये विद्याधर बुद्धांना हार घालत आहेत. तर दुसऱ्या शिल्पात बुद्ध प्रतिमेवर मकर आहे. बुद्धाने सर्व इंद्रियांवर विजय मिळवला याचे प्रतीक आहे. खाली नागराजे सेवा करताना आहेत. ही समिती कक्ष असून कक्षास बैठक असून त्याखाली सिंह, हत्ती, हरण, मानव यांची शिल्पे आहेत. ज्यांनी एकमेकांच्या शेपटी हातात धरलेल्या आहेत. एकमेकावर अंकुश ठेवण्याची स्थिती दर्शवते. त्याच्या आतील बाजूस गर्भगृह आहे. गर्भगृहाच्या भिंतीवर तरुण पुरुष आपले बलवर्धन दाखवत आहेत. त्या शेजारी त्याची पत्नी यांची शिल्पे असून त्यांच्या शेजारी लहान मुलगा आहे. हे तत्कालीन महाभोजाचे शिल्प आहे. आतील बाजूस ज्योत्यावर स्तूप आहे स्तूपावर वेदिका पट्टी हर्मिका चौथरा दिसून येतो. स्तूप बुद्धाचे प्रतिक असते. त्याभोवती प्रदक्षिणा घातली जाते. हा कक्ष विजया नावाच्या महभोज पदी असणाऱ्या स्त्रीच्या मुलाने जो कारकून होता सुलसदत्त पत्नी उत्तरदत्ता, भाऊ शिवम त्याची पत्नी विजया यांनी विहार खोदण्यास, शिवदत्त व त्याची मुलगी हिने स्तंभ कोरण्यात, तसेच शिवपाल, शिवदत्त सापिल यांनी लेणे खोदण्यास दान दिले आहे. असे लिखित शिलालेखात जाणवते.
• लेणी क्रमांक ७ :
लेणी क्रमांक सात ही एक विहार लेणी असून बाहेरील बाजूस व्हरांडा आहे. ही लेणी एका इसिरक्षीत जो बुद्ध अनुयायी होता. ज्याचा मुलगा एक वैद्य होता. त्याने व त्याच्या कुटुंबाने ही लेणी दान दिली आहेत. शिलालेखात त्याचा, मुले नाग, ईशिरथी, शिवभोज, इसिपालिता, कुष्मा, धम्मा, सफा यांनी दान दिलेचा उल्लेख आहे.
• लेणी क्रमांक ८ :
आठवे लेणे एक चैत्यगृह आहे. बाहेरील भाग उद्ध्वस्त झालेला असून लेण्याच्या बाहेर एक पौडी म्हणजे पाण्याचे टाके आहे. सदर लेणी शिलालेखवरून असे जाणवते की ही लेणी आयतालू गावातील एका ब्राह्मण उपासकाच्या पत्नीने दिलेल्या दानातून खोदली आहे.
• लेणी क्रमांक ९ :
ही लेणी एका फुलविक्रेता म्हणजे माळी समाजाच्या व्यक्तीने वधूक नावाच्या माळ्याचा मुलगा शिवपारक यांनी दान स्वरूप दिले आहे.
• लेणी क्रमांक १०,११,१२,१३ : अस्पष्ट आहेत. या विहार असाव्यात असे जाणवते.
• लेणी क्रमांक १५ :
हा एक चैत्यगृह आहे. चार स्तंभ होते. दोन स्तंभ अर्ध आहेत. आतील बाजूस भिक्षू निवास असून मध्यभागी चैत्य आहे. मंदाड राज्यातील महभोज वेलीदत्त याच्या कारकिर्दीत अहिलस पुत्र रामदत्त व त्याची पत्नी यांनी दान स्वरूपात ही लेणी दिली आहेत.
• लेणे क्रमांक १६ :
हे एक भिक्षू निवास आहे. बाहेरील बाजूस पाण्याची टाकी आहेत. ही लेणी विजयनाग यांची शिष्या सपील भिक्षूनी तसेच लोहित व तिची शिष्या बोधी यांनी दान स्वरूप दिली आहेत.
• लेणी क्रमांक १७,१८ ही लेणी एक विहार असून ती एका वाहतूक करणाऱ्या तत्कालीन चालकाने दिलेल्या दानात खोदली आहेत. तर १८ व लेणे एका व्यापाऱ्याने दिलेले आहे. हे देखील एक विहार लेणे आहे.
• लेणी क्रमांक १९ भिक्षू निवास आहे. म्हणजे विहार.
• लेणी क्रमांक २० : हा एक चैत्यगृह आहे. बाहेरील बाजूस पाण्याचा कुंड आहे.
• लेणी क्रमांक २१ भिक्षू निवास बाहेरील बाजूस कुंड म्हणजे पाण्याचे टाके आहे.
• लेणी क्रमांक २२ : ही लेणी भिक्षू निवास असून सार्थवाहक (चालक) त्याच्या पत्नीने शिवदत्ता व मुलगा यांनी दान स्वरूपात दिली आहेत.
• लेणी क्रमांक २३,२४,२५,२६ या लेणी देखील भिक्षू निवास असून त्या भग्न झालेल्या आहेत.
• भ्रमंतीवेळी अनेक वस्तू लागतात. त्या तुम्ही खालील वेबसाईटच्या आधारे पाहू शकता. खरेदी करू शकता.
• ट्रॅव्हल श्याक /Tripole Aur Trekking and Travel Rucksack
👉https://amzn.to/4rDgX2V
• ट्रेकिंग शूज/ Trekking shoes / Hiking shoes
👉 https://amzn.to/4uyIUeZ
• टोपी / Sun Cap / hat :
👉 https://amzn.to/4bRniDe
• कॅमेरा / Action Camera :
👉 https://amzn.to/4biTU90
• सेल्फी स्टिक/ Selfie stick. :
👉 https://amzn.to/4bGETNg
• बॅटरी/ LED Headlamp / Torch :
👉https://amzn.to/4bNNUoN
• रोहन दोरी /Climbing rope :
👉https://amzn.to/41bmO4P
• कॅरेबिनर हुक/ Carabiner Hooks :
👉 https://amzn.to/4uDMC7i
• फर्स्ट अँड कीट /First Aid kit :
👉https://amzn.to/4bx27VF
• कॅम्पिंग टेन्ट /Camping Tent :
👉https://amzn.to/47bm973
• झोपण्याची बॅग / Sleeping Bag :
👉 https://amzn.to/40IDYqn
• दुर्बीण /Telescope
👉 https://amzn.to/4snpwQS
• कुडा लेणी बाबत महत्वाची माहिती :
• सदर लेणी इसवी सनाच्या पहिल्या ते तिसऱ्या शतकात कोरल्या गेल्या आहेत.
• सदर लेण्यातील भाषा ही ब्राह्मी, संस्कृत, महाराष्ट्री प्राकृत लिपीत आहेत. त्यावरून या लेणी कुणी कोणत्या काळात दिल्या याची माहिती मिळते.
• ही लेणी समुद्राच्या दिशेला कोरलेली आहेत.
• जवळील गाव मंदाड हे प्राचीन नगर मंदावस, मंदार होते हे समजते.
• सदर लेणी बुद्ध अनुयायी, शिष्य, व्यापारी, गाडीचालक, फुलविक्रेता, मुख्य राज्यातील अधिकारी, मंत्री, सावकार, वैद्य, ब्राह्मण, जैन यांद्वारे दिलेल्या दानात खोदून दिली गेली आहेत. तसेच सातवाहन काळात मंदाड या छोट्याशा राज्यात अथवा विभागात खोदल्या गेल्या.
• सदर लेण्यात बुद्ध प्रतिमा, स्तूप, नाग, चक्र, गजशिल्प, मिथून शिल्प यांची रचना समजते. मागील बाजूस असलेल्या मानव शिल्पातून त्यांनी धारण केलेल्या वस्त्र, अलंकार यातून तत्कालीन समाजाचा आरसा समजतो. संस्कृती समजते.
• चैत्य : हे एक बुद्ध मंदिर असते. बाहेर व्हरांडा, आतील बाजूस समिती कक्ष त्यामध्ये चौसोपी बैठक असते. जिथे धर्म, तत्कालीन समस्या, राज्यातील व्यवहार याबाबत चर्चा होते. सामूहिक प्रार्थना, ध्यान, घेतले जाते. गर्भगृहात स्तूप असतो. स्तूपावर वेदिका पट्टी असते. परिक्रमा करताना तिचा स्पर्श करुन करतात. वरील बाजूस हर्मिका चौथरा असून त्यावर बुद्ध अथवा धर्मीय प्रमुख आचार्य यांच्या मृत्यूनंतर अस्थी ठेवल्या जातात. या लेणी चैत्य म्हणजे एक लयन मंदिर आहेत.
• विहार :
चारिका करत फिरणारे साधू, भिक्षू यांना राहण्यासाठी या विहार खोल्या बनवल्या आहेत. यामध्ये बैठक व शयन व्यवस्था आहे. एक प्रकारे धर्मशाळाच आहेत.
• काळाच्या ओघात नैसर्गिक संकटांनी तसेच समाजकंटकांनी या लेण्यांची नासधूस केली आहे.
• इसवी सन १८४८ साली काही ब्रिटिशांनी या लेणी निदर्शनात आणल्या.
• अलीकडे या लेण्यांचा जीर्णोध्दार केला असून त्यांना जाळीदार दरवाजे बसवले आहेत.
• आता या लेणी भारतीय पुरातत्व व पर्यटन खात्याच्या देखरेखीखाली आहेत.
• अशी आहे कुडा लेणी समूहाविषयी माहिती kuda leni vishyi mahiti

























































