काटेपूर्णा अभयारण्य विषयी माहिती
Katepurna abhyarany vishyi mahiti
स्थान :
महाराष्ट्र राज्यातील विदर्भ विभागात कमी पावसाच्या भागात वरदान ठरलेले काटेपूर्णा नदीच्या उगम भागात अकोला व वाशिम जिल्ह्याच्या सीमेवर आपल्याला काटेपूर्णा अभयारण्य पहायला मिळते. पश्चिम विदर्भास पाणी देणारे जंगल म्हणून या अभयारण्याची ओळख आहे.
क्षेत्रफळ :
सुमारे ७३.६९ चौरस किमी क्षेत्र या अभयारण्याचे असून महान गावाजवळ असलेल्या महान धरण पाणलोट बॅकवॉटर परिसरात हे अभयारण्य पसरलेले पहायला मिळते.
अभयारण्य परिसरात जायचे कसे?
• अकोला येथून काटेपूर्णा अभयारण्य हे ३६ किलोमीटर अंतरावर आहे.
👉 अकोला – बार्शी टाकळी – महान येथून काटेपूर्णा अभयारण्य पहायला जाता येते.
• वाशिम – मंगळूरपीर – शेलू बाजार – अकोला रोडने आनंद बुद्ध विहार येथून आपण काटेपूर्णा अभयारण्य पहायला जाऊ शकतो.
• नागपूर हे येथून जवळ असणारे अंतरराष्ट्रीय ठिकाण रस्ते, लोहमार्ग, हवाईमार्गाने भारतातील इतर शहरांना जोडले गेले आहे.
👉 नागपूर – कारंजा – भूर्र येथून काटेपूर्णा अभयारण्य पहायला जाता येते.
• सोनगाव हे येथून जवळील विमानतळ २९२ किलोमीटर अंतरावर आहे.
• मुंबई - नागपूर रेल्वे मार्गावर अकोला जंक्शन पासून ४० किलोमीटर अंतरावर हे अभयारण्य आहे.
• अभयारण्यात जाण्यासाठी वाशीम जिल्ह्यातून फेट्रागेट आहे.
• अकोला जिल्ह्यात महान गावातून आनंद बुद्ध विहार वाघा येथून आपल्याला अभयारण्य पहायला जाता येते.
• अभयारण्य परिसरात पाहण्यायोग्य ठिकाणे :
• वाघागाव परिसर :
अभयारण्य परिसरात पूर्वी वाघा नावाचे गाव होते. हल्ली ते पुनर्वसित करण्यात आलेले आहे. या परिसरात वन्य प्राणी वावर असतो.
• धरण पाणलोट क्षेत्र :
महान धरणाच्या बॅक वॉटर परिसराचे सुंदर दर्शन घडते. तसेच तिकीट काढून नौका विहार करण्याची व जलक्रीडा करण्याची संधी प्राप्त होते. तसेच अनेक स्थलांतरित पाणपक्षी पाहता येतात. धरण परिसरात सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी सुंदर उगवताना व मावळताना सूर्याचे दर्शन घेता येते.
• वाघा मंदिर परिसर :
धरण परिसरात बॅकवॉटर परिसरात वाघागड नावाच्या ठिकाणी आपल्याला हिंदू मंदिर समूह पाहता येतो. अन्नपुर्णा माता मंदिर, गजानन महाराज मंदिर, जगदीश महाराज संस्थान, श्री राम मंदिर, गंगा माता टेंपल पाहता येते.
• बालोद्यान :
मंगळूरपीर रस्त्याला लागूनच थोड्या अंतरावर आनंद बुद्ध विहार परिसरात लहान मुलांसाठी बालोद्यान पाहता येते. या ठिकाणी सुंदर मुलांसाठी क्रीडाक्षेत्र बनवले आहे.
• गेरूचा घाट :
प्राणी पहायला गेरूचा घाट हे ठिकाण प्रसिद्ध आहे. येथील माती तपकिरी रंगाची आहे. जीला गेरू असे म्हणतात. त्यावरून या क्षेत्राला गेरूचा घाट असे म्हटले जाते.
घारीची खिंड व दरी:
जंगलात सफर करताना आपल्याला एक खिंड लागते. या परिसरात उंच कपारीत दरीत अनेक घार पक्षांची घरटी आहेत. या परिसरात आपल्याला घारींचे दर्शन घडते. दरीतून उडताना आपल्याला पाहायला मिळतात.
• जंगल वाटा :
वनक्षेत्र भ्रमंती करण्यासाठी अनेक जंगल वाटा विकसित केलेल्या असून जिप्सी व कॅन्टर सारख्या गाडीतून आपल्याला अरण्य सफरीचा आनंद लुटता येतो. या जंगलवाटेवरून भ्रमंती करताना स्थानिक गाईड घ्यावा लागतो. जो अभयारण्य पहायला मदत करतो. या जंगल वाटेवर अनेक ठिकाणी निरनिराळ्या वनस्पती लागवड तसेच बांबूची लागवड केली असून त्यामुळे जंगलवृद्धी झालेली दिसून येते.
फेट्रा गेट व महान धरण परिसर विभागातून असलेल्या गेटने जाणे फायद्याचे आहे.
• अभयारण्य परिसरात असलेले वृक्ष :
पश्चिम विदर्भ हा झुडपी काटेरी वृक्षाचा असून या ठिकाणी मुख्यतः खैर, साल, तेंदूपत्ता,मोह, आओल, तरड, धावडा, बहवा, पळस, निंब, बांबू, घोस्ट ट्री, ( वेगवेगळ्या ऋतूत खोडाचा रंग बदलणारे व चांदण्या रात्री चकाकणारे झाड) साग, बाभूळ, खैर, निवडुंग, रानमेवा झुडपे, करवंद, कटकी, चांगुणा, सगुणा वगैरे. तसेच वनखात्याने लागवड केलेल्या नवीन वनस्पती पहायला मिळतात. ११५ पेक्षा जास्त मुख्य वनस्पती प्रजाती पहायला मिळतात.
• अभयारण्य परिसरातील प्राणी :
चौसिंगा, भुकणारे हरिण, काळे हरिण, बिबट्या, जंगली डुक्कर, लांडगे, तरस, ससे, नीलगाय, रानमांजर, माकडे, चित्ता यासारखे प्राणी या अभयारण्य परिसरात पहायला मिळतात.
• पक्षी जीवन :
गरुड, बगळे, करकोचे, फ्लेमिंगो, घुबड, मोर, रानकोंबडे, ससाणे, मच्छीमार, भारद्वाज, खंड्या, साळुंकी, कोकिळ व पाणलोट परिसरात येणारे अनेक पाणपक्षी पाहता येतात.
• सरीसृप :
हे अरण्य झुडपी काटेरी असल्याने विशेषत, सापाच्या वेगवेगळ्या प्रजाती, घोरपड, पाल, सरडे व अन्य सरीसृप येथे पहायला मिळतात.
• उभयचर प्राणी:
काटेपूर्णा नदीच्या पाणलोट बॅकवॉटर परिसरात हे अभयारण्य येत असल्याने पाणथळ जागी बेडूक, खेकडे तसेच अन्य जलचर प्राणी पहायला मिळतात.
• कीटक जीवन :
रंगीबेरंगी फुलपाखरे, शिकार किडा, मधमाश्यांची पोळी, अनेक लहान मोठे कीटक या जंगलात आढळतात. जे स्थानिक पक्षांचे आवडते खाद्य आहे.
शिकार किडा हा उन्हाळ्यात जास्त आढळतो. ज्याच्या आवाजाने जंगल अशांत होते.
• गवत :
अभयारण्य परिसरात निरनिराळ्या गवत प्रजाती आढळत असून हरणांचे ते आवडते खाद्य आहे.
• राहण्यासाठी सोय :
• वाघा परिसरात सेंच्युरी या ठिकाणी राहण्यासाठी लॉज बांधलेल्या आहेत. एसी, नॉन एसी रूम उपलब्ध आहेत. तसेच अनेक उपहारगृहे देखील परिसरात बाहेरील बाजूस आहेत. जवळच महान गाव आहे. तिथे जेवण व राहण्याची सोय होऊ शकते.
भ्रमंतीवेळी अनेक वस्तू लागतात. त्या तुम्ही खालील वेबसाईटच्या आधारे पाहू शकता. खरेदी करू शकता.
• ट्रॅव्हल श्याक /Tripole Aur Trekking and Travel Rucksack
👉https://amzn.to/4rDgX2V
• ट्रेकिंग शूज/ Trekking shoes / Hiking shoes
👉 https://amzn.to/4uyIUeZ
• टोपी / Sun Cap / hat :
👉 https://amzn.to/4bRniDe
• कॅमेरा / Action Camera :
👉 https://amzn.to/4biTU90
• सेल्फी स्टिक/ Selfie stick. :
👉 https://amzn.to/4bGETNg
• बॅटरी/ LED Headlamp / Torch :
👉https://amzn.to/4bNNUoN
• रोहन दोरी /Climbing rope :
👉https://amzn.to/41bmO4P
• कॅरेबिनर हुक/ Carabiner Hooks :
👉 https://amzn.to/4uDMC7i
• फर्स्ट अँड कीट /First Aid kit :
👉https://amzn.to/4bx27VF
• कॅम्पिंग टेन्ट /Camping Tent :
👉https://amzn.to/47bm973
• झोपण्याची बॅग / Sleeping Bag :
👉 https://amzn.to/40IDYqn
• अभयारण्य परिसरात फिरताना घ्यावयाची काळजी :
• अभयारण्य पहायला जाताना कोणत्याही प्लॅस्टिक वस्तू, कागद नेण्यास मनाई आहे.
• जाताना आपला मोबाईल फोन बंद करून जमा करावा लागतो. सेल्फी घेण्यास सक्त मनाई आहे.
• सफरीसाठी प्रवेश चार्ज घेतला जातो. ते तिकीट दाखवूनच आतमध्ये प्रवेश मिळतो.
• या ठिकाणी सफरीसाठी जिप्सी व कॅन्टर , जीप या प्रकाराच्या गाड्यांना परवानगी आहे.
• सफर करताना वाहनातून खाली उतरू नये.
• प्राणी पाहून कोणताही आवाज करू नये. किंवा त्यांना त्रास होईल असे कृत्य करण्यास मनाई आहे.
• अभयारण्य परिसरात जाताना पिण्याच्या पाण्यासाठी काचेची बाटली वापरा. प्लॅस्टिक बाटलीस बंदी आहे.
• अभयारण्य परिसरात धूम्रपान, मद्यपान करण्यास सक्त मनाई आहे.
• सफर करताना वन विभागाकडून परवानगीने एक गाईड व ड्राइव्हर दिला जातो. ते आपणास अरण्य सफर करण्यास मदत करतात.
• कॅमेरा, दुर्बीण नेण्यास परवानगी आहे. पण चार्जेस घेतले जातात.
• गेट जवळील काही अंतरावर असलेल्या दुकानातून आपण ते विकत अथवा भाड्याने घेऊ शकतो.
• वाघा सेंच्युरी गेट तसेच इतर काही गेट पासून परिसरात अनेक उपहारगृहे, लॉज आहेत. तिथे आपल्या खाण्याची व जेवणाची, रहाण्याची व्यवस्था सोय होऊ शकते. विशेषत आनंद बुद्ध विहार वाघा परिसरात किंवा महान गावी ही सोय होऊ शकते.
• अशी आहे काटेपूर्णा अभयारण्य विषयी माहिती.
Katepurna abhyarany vishyi mahiti marathi madhe










कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
ही एक वैयक्तिक माहितीपर वेबसाईट आहे. येथे दिलेली माहिती अभ्यास व संदर्भासाठी आहे.
अधिकृत माहितीसाठी संबंधित सरकारी संकेतस्थळ पाहावे.