मदनगड किल्ल्याची माहिती
Madangad kilyachi mahiti marathi madhe
स्थान :
महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातून जाणाऱ्या उत्तर सह्याद्री पर्वताच्या पश्चिम बाजूस असणाऱ्या कळसूबाई शिखराच्या डोंगर रांगेत अलंग, मदनगड व कुलंग हे किल्ले आपणास पाहायला मिळतात.
यामध्ये असणारा मदनगड हा एक किल्ला आहे.
• उंची :
या किल्याची उंची ही समुद्रसपाटी पासून ४९००फूट / १४९३.५२ मीटर आहे.
• किल्यावर जाण्यासाठी वाहतूक मार्ग :
• मदनगड किल्ल्याजवळ पायथ्याशी आंबेवाडी हे गाव आहे.
• आंबेवाडी हे गाव नाशिक शहरापासून ५५ किलोमिटर अंतरावर आहे.
• नाशिक – इगतपुरी - आंबेवाडी – या ठिकाणाहून पायी ट्रेक करत गडावर जाता येते.
• आंबेवाडी हे ठिकाण पुण्यापासून १८२ किलोमीटर अंतरावर आहे.
• मुंबई पासून १४० किलोमीटर अंतरावर आहे.
• सूरत या गुजरात राज्यातील ठिकाणापासून ३०० किलोमीटर अंतरावर आहे.
• मुंबई, पुणे, नाशिक, सुरत ही भारत देशातील मुख्य शहरे असून ती जमीन व हवाई मार्गाने राज्यातील इतर भागांशी तसेच आंतरराष्ट्रीय प्रदेशांना जोडली गेलेली आहेत. याठिकाणी रस्ते व लोहमार्गाचे जाळे दिसून येते.
• आंबेवाडी पर्यंत पोहोचण्याचा उत्तम मार्ग हा रस्ते मार्ग आहे.
• मदनगड किल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे :
• नाशिक मार्गे इगतपुरीहून आपणास आंबेवाडी मार्गे गडाच्या पायथ्याला असणाऱ्या परिसरात येता येते. या ठिकाणी आल्यावर गुगल म्यापद्वारे आपण जंगलातून मार्गक्रमण करत किल्याच्या परिसरात येतो.
• खडतर जंगली पायी ट्रेक :
किल्याच्या परिसरात जंगली माळभाग परिसर लागतो. येथील विरळ जंगल प्रदेशात पायवाटेने उंच सखल टेक चढत आपण गडाच्या दिशेने चालत जाऊ शकतो. वाटेत पावसाळी पाण्याने निर्माण झालेल्या घळ वाटेने आपण खिंडीच्या परिसरात येतो. येताना वाटेत पाण्याचा ओढा लागतो.
• पाण्याचा ओढा :
जंगलमार्गे चालत गेल्यावर आपणास जंगलातून वरील भागातून आलेला एक ओढा पाहायला मिळतो या ओढ्याला पावसाळी दिवसात भरपूर पाणी असते. उन्हाळी दिवसात पाणवठे आटू लागतात. येथील सर्व सजीव प्राणी, पक्षी व वनस्पतींची आवश्यक पाण्याची गरज येथूनच पूर्ण होते
• खिंड कात्याळ शिल्प :
जंगली अरण्यातून अनेक उंचवटे पार करत आपण गडाच्या उंच कात्याळ कड्याजवळ येतो. तेथून
पायी चालत आपण गडाच्या पायथ्याशी येतो तिथे कात्याळ शिल्पे आहेत. येथे किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग दाखवला आहे. अलंग, मदनगड व कुलंग असे या किल्ल्यांची नावे आहेत. कातळ शिल्पाच्या उजवीकडील रस्ता हा मदन गडाकडे जातो. या वाटेने आपण कात्याळ प्रस्तर असलेल्या गडाच्या चढणीच्या वाटेला लागतो.
• कठीण कात्याळ चढ व पायरी मार्ग :
येथून ट्रेक खूप अवघड होत जातो. थोडे चढून गेल्यावर आपणास कात्याळ पायरी मार्ग लागतो. जो कड्यामध्ये कड्यात जागोजागी खोदून तयार केल्याचे दिसून येतो. या पायऱ्यांच्या रचना पाहता पाणी न थांबता निचरून जाण्याची रचना दिसते. या मार्गाने आपण गडावर चढून जाऊ शकतो.
India fort
• अरुंद पायरी खडा मार्ग :
• गडावर चढून जाताना हा गड त्रिजोडी असल्याने बाजूच्या डोंगराच्या भागातून गडावर जाण्यासाठी असणाऱ्या अरुंद प्रस्तर वाटेने आपण चढून जाताना खूप दमछाक होते. पुढे काही ठिकाणी वाटेतील मार्ग भूस्खलनाने ढासळलेला दिसून येतो. याठिकाणी तार व दोर रोलिंग साठी लावलेले आहेत. एका बाजूला खोल दरी तर दुसरीकडे खडा काळा प्रस्तर पाषाण आहे. ज्यांना गिर्यारोहण करण्याची सवय आहे. व उंच जागेची भीती वाटत नाही अशा लोकांसाठी पंढरी म्हणून या मदनगड ट्रेककडे पाहिले जाते. एका वेळी एकच व्यक्ती या अरुंद वाटेने किल्ला चढू शकतो. पुढे वरील भागात चढून जाण्यासाठी रोप लावलेला आहे. या रोपाच्या आधारे चढून वरील भागाकडे आपण जातो. जसजसे वर जावे तसं तसे आपल्याला सुंदर परिसरातील कुलंग किल्ला, अलंग किल्ला, कळसुबाई शिखर व अन्य सहयाद्री पर्वतातील शिखराचे व भाटघर धरण व अन्य पाणलोट क्षेत्राचे दर्शन घडते.
अरुंद वाट
Fort
• दरवाजा :
गडाचे दरवाजे भग्न झालेले आहेत. त्यांचे अवशेष पाहायला आजूबाजूला पडलेले पाहायला मिळतात.
सध्या येथे एकही दरवाजा अस्तित्वात नाही.
• फडताळ पाण्याचे टाके :
गडाच्या दरवाजा व इतर वास्तूंचे बांधकाम करण्यासाठी येथील पायरी मार्गावरील प्रस्तर चिरून अंतर्गत एक छोटेसे पाणी टाके खोदलेले पहायला मिळते. पावसाळी ऋतूत यामध्ये पाणी साचते. व गडावरील लोकांच्या पाण्याची सोय व्हावी या हेतूने याची निर्मिती केल्याचे दिसते. देवडीत राहणाऱ्या पहारेकऱ्यांसाठी ते खोदले असावे.
• विस्तृत पठार माथा :
गडाच्या वरील बाजूस छोटेसे विस्तृत पठार आहे. याचा उतार थोडा मंद आहे. या भागाचा वापर देखरेख करण्यासाठी केला जाई. येथून संपूर्ण परिसरातील व्यापारी मार्ग व इतर हालचालींवर प्राचीन व मध्ययुगीन काळात देखरेख ठेवली जात असे.
• पाण्याची टाकी :
गडाच्या माथा उतार लक्षात घेऊन पाणी वाटेवर प्रस्तर खोदून त्यातील दगड काढून जोड पाण्याची टाकी गड माथ्यावर केलेली दिसतात. पावसाळी दिवसात या टाक्यांमध्ये पाणी साठवले जाई. व त्या पाण्याचा वापर पिण्यासाठी व खर्चासाठी वर्षभर केला जाई.
Kille
• कात्याळ खोदीव गुहा खोली :
गडाच्या उंच भागात बांधकाम करण्यास खालून माल न नेता. येथील प्रस्तर खोदून एक खोली तयार केलेली दिसून येते. सुंदर छिन्नी हातोडा वापरून दगड काढून एक लयन खोली शिबंदीतील लोकांना राहण्यासाठी केलेली दिसून येते. या ठिकाणी हल्ली गड भ्रमंतीस येणारे गिर्यारोहक राहतात.
• बांधकाम अवशेष :
गडाच्या वरील बाजूस आपल्याला भूमिस लागून बांधकाम ज्योत्याचे अवशेष पाहायला मिळतात. बाजूला काही दगड पडलेले आहेत. या ठिकाणी किल्यावर कामकाज पाहणारे अधिकारी व सैनिक यांना राहण्यासाठी काही बांधकाम केले असावे. काळाच्या ओघात ते दुर्लक्ष झाल्याने नष्ट झाल्याचे दिसून येतात. आता अवशेष पाहायला मिळतात.
• हा किल्ला व्यापारी मार्गावर टेहळणी करण्यासाठी व कुलंग व अलंग गडावर हल्ला करण्यासाठी या जागेचा वापर होऊ नये. म्हणून विकसित केला असावा हे प्रथमदर्शी जाणवते. येथे सध्या जास्त बांधकाम नसून मोजक्या सैनिकांना देखरेख करण्यासाठी हा किल्ला बांधला गेल्याचे तांत्रिकदृष्ट्या जाणवते.
• किल्याच्या उत्तरेस हरिहर, त्र्यंबक, अंजनेरी. दक्षिणेस हरिश्चंद्र आजोबागड, खट्टाशिखर, कोकणकडा, पूर्व बाजूला कळसुबाई, अलंग किल्ला तर पश्चिम बाजूस कुलंग किल्ला आपल्याला गड माथ्यावरून दिसून येतो.
सूर्यास्त
Maharashtra kille
• मदनगड किल्याची ऐतिहासिक माहिती :
• मदनगड या किल्याची निर्मिती यादव राजवटीत झाली असावी असे मानले जाते कुलंग आणि अलंग या किल्ल्यांच्या जोडगोळी असलेल्या किल्यावर शत्रू ताबा मिळवण्यासाठी या मदनगड असलेल्या डोंगराचा वापर करू नये म्हणून मदनगड विकसित केला असावा. तसेच हा किल्ला व्यापारी मार्गावर टेहळणी करण्यासाठी पूर्वी येथे चौकी असावी असे येथील स्थानिक लोकांच्या बोलचालीत म्हटले जाते.
• इसवी सनाच्या ९ते ११ या काळात हा डोंगर यादव घराण्याच्या राजवटीत दाखल झाला. याचे भौगोलिक स्थान लक्षात घेता. टेहळणी व परिसर सुरक्षितता या दृष्टीने विचार करून येथे टाकी व गुहाखोली, दरवाजा अन् पायरीमार्ग विकसित करण्यात आला.
• पुढे सुलतानशाहीत मुस्लिम राजवटीत व नंतर मराठी राज्यात हा किल्ला होता
• काही काळ नाशिक विभागात असताना मुघल राजवट देखील या किल्ल्याने पाहिली आहे
• पुढे हा किल्ला स्वराज्यातील पंतप्रधान पेशवे यांच्या ताब्यात इसवी सनाच्या १७६० साली कुलंग किल्यासोबत दाखल झाला.
• त्यानंतर इसवीसन १८१८ मध्ये हा किल्ला ब्रिटिशांनी आपल्या ताब्यात घेतला. त्यानंतर त्यांनी येथील पायरी मार्गाची मोडतोड केली. व किल्याचा दरवाजा व इतर वास्तू नष्ट केल्या. कारण पुन्हा मराठ्यांनी एकजूट होऊन आपल्या सत्तेला आव्हान देवू नये म्हणून ही प्रेरणास्थाने नष्ट केली गेली.
• इसवी सन १९४७ सालानंतर हा किल्ला स्वतंत्र भारत सरकारच्या ताब्यात आहे.
• हल्ली अनेक ट्रेकर्स A. M. K. या नावाखाली गिर्यारोहण करण्यासाठी अलंग, मदनगड व कुलंग या तीन किल्ल्यांची ट्रेकिंग करतात.
• राहण्याची सोय कशी?
• किल्याच्या परिसरात असणारे पाणवठे हे फेब्रुवारी महिन्यानंतर आठतात. तरी ट्रेकला जाणाऱ्यांनी जास्तीत जास्त ऑक्टोंबर ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत ट्रेक करावा. पावसाळ्यात देखील ट्रेक केला जातो. मात्र काळजी घ्यावी. शेवाळ वाढून निसरट होते. त्यामुळे ऑक्टोबर ते फेब्रुवारी ट्रेक उत्तम आहे.तसेच परिसरातील अनुभवी गाईड घेणे अत्यंत चांगले.
India fort
• जेवणाच्या सोयीबाबत काय?
• जेवणाची सोय या ठिकाणी होत नाही. मात्र राहण्याची होऊ शकते. या ठिकाणी गुहा आहे. जेवणाची सोय स्वतः च करावी लागते. फेब्रुवारी महिन्यापासून पाण्याचे दुर्भिक्षण जाणवते.
• येथील कुंडातील पाणी पिण्यासाठी योग्य आहे. पण ते प्रक्रियक लहान फिल्टर केले तर चांगले.
• अशी आहे मदनगड किल्ल्याची माहिती
Madangad kilyachi mahiti marathi madhe











कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
ही एक वैयक्तिक माहितीपर वेबसाईट आहे. येथे दिलेली माहिती अभ्यास व संदर्भासाठी आहे.
अधिकृत माहितीसाठी संबंधित सरकारी संकेतस्थळ पाहावे.