crossorigin='anonymous' src='https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-1553308877182847'/> महाराष्ट्र किल्ले व स्थळे यांची माहिती Forts and places in maharashtra: खरोसा लेणी (Kharosa Leni, Maharashtra)

गुरुवार, १९ फेब्रुवारी, २०२६

खरोसा लेणी (Kharosa Leni, Maharashtra)

 खरोसा लेणी (Kharosa Leni, Maharashtra)

खरोसा लेणी (Kharosa Leni, Maharashtra)


स्थान :

महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यात, निलंगा–लातूर रोडवर असलेल्या खरोसा गावाजवळील डोंगरात जांभ्या (लॅटेराइट) दगडात खोदून बनवलेली लेणी खरोसा लेणी म्हणून ओळखली जातात.

लेणी पाहायला जायचे कसे?

पुणे विमानतळापासून : सुमारे ३७० किमी

हैदराबाद येथून : सुमारे २९८ किमी

औरंगाबाद येथून : सुमारे २६४ किमी

रेल्वे मार्ग :

लातूरकडे जाणाऱ्या रेल्वे मार्गावर हरंगुले रेल्वे स्टेशन उतरून खरोसा लेण्यांकडे जाता येते.

रस्ते मार्ग :

लामजना–निलंगा रोडवर खरोसा गाव येते. हे गाव रस्तेमार्गाने जोडलेले आहे. खाजगी वाहनाने किंवा बसद्वारे थेट जाता येते.

खरोसा लेणी (Kharosa Leni, Maharashtra)


लेणी परिसरात पाहण्यासारखी ठिकाणे :

खरोसा गावाजवळील डोंगराकडे जाणाऱ्या फाट्याने लेणी परिसरात प्रवेश करता येतो. वाहन पार्किंगची सोय असून तेथून लेणी पाहण्यासाठी जाता येते.

या परिसरातील डोंगर जांभ्या दगडाचा असून कोकणातील खडकासारखा आहे. येथे सुमारे वीस लेणी पाहायला मिळतात.

खरोसा लेणी त्रिधर्मीय आहेत –

बौद्ध लेणी

हिंदू (शैव) लेणी

जैन लेणी

या लेण्यांची निर्मिती वेगवेगळ्या काळात झाल्याचे जाणवते.

बौद्ध लेणी :

खरोसा लेणी (Kharosa Leni, Maharashtra)


बौद्ध लेणी ही हीनयान पंथाच्या काळात तयार झाली असून तत्कालीन राजे, भिक्षुक, निधी व परिसरातील श्रीमंत वर्गाने दिलेल्या दानधर्मातून या लेण्या खोदण्यात आल्या.

लयन (विहार–चैत्य) मंदिर प्रणालीनुसार ही लेणी बनवलेली असून काही ठिकाणी विहार, तर काही ठिकाणी चैत्य दिसून येतात.

लेणी क्रमांक १ :

हे एक बौद्ध धर्मीय लेणे आहे. यामध्ये एक विहार कक्ष दिसून येतो. प्रवेशासाठी छोटे द्वार आहे.

उन्हाळ्यात थंड, तर पावसाळ्यात उबदार हवामान जाणवते. बौद्ध भिक्षूंसाठी हे विश्रांती कक्ष म्हणून बांधले असावे.

दुसरे लेणे :

बाहेरील बाजूस एक भग्न स्तूप आहे. यावरून हे पूर्वी प्रार्थनास्तूप लेणे होते असे दिसते.

आतील बाजूस विस्तृत दालन असून मागील बाजूस गर्भगृह आहे. त्यामध्ये महायान पंथीय बुद्ध मूर्ती स्थापित केलेली दिसते.

लेण्याच्या बाहेरील दोन्ही बाजूंना ध्यानकक्ष पाहायला मिळतात.

खरोसा लेणी (Kharosa Leni, Maharashtra)

खरोसा लेणी (Kharosa Leni, Maharashtra)

खरोसा लेणी (Kharosa Leni, Maharashtra)


इतर बौद्ध लेणी :

या परिसरातील बहुसंख्य लेणी बौद्ध धर्मीय आहेत. काही चैत्य स्वरूपातील आहेत.

चैत्यांमध्ये दोन्ही बाजूंना स्तंभ असून त्यांच्या मागील बाजूस प्रदक्षिणा मार्ग दिसतो. काळाच्या ओघात काही स्तंभ भंग पावलेले असून प्रदक्षिणा मार्ग बंद झालेला दिसतो.

काही लेणी दुमजली आहेत. बाहेरील बाजूस पद्मपाणी व चक्रपाणी यांच्या भग्न होत चाललेल्या मूर्ती कोरलेल्या आहेत.

आतील बाजूस विस्तृत सभागृह व गर्भगृह दिसते. काही लेणी विश्रांती व ध्यान–समाधीसाठी बांधलेली आहेत.

हिंदू (शैव) लेणे :

हे लेणे चालुक्य राजवटीच्या काळात, विशेषतः इसवी सनाच्या ६व्या ते ८व्या शतकादरम्यान खोदले गेले.

हे एक भव्य शिव मंदिर आहे. अनेक मोठे खांब असून त्यांच्या वरील बाजूस भारवाहक कोरीव काम दिसते.

खरोसा लेणी (Kharosa Leni, Maharashtra)

खरोसा लेणी (Kharosa Leni, Maharashtra)

खरोसा लेणी (Kharosa Leni, Maharashtra)

खरोसा लेणी (Kharosa Leni, Maharashtra)

खरोसा लेणी (Kharosa Leni, Maharashtra)


रचना पुढीलप्रमाणे आहे –

बाह्य सभागृह

अंतराळ

अंतराळात नंदी

पुढे गर्भगृह

गर्भगृहाच्या बाहेरील बाजूस द्वारपाल

आत शिवपिंडी व नाग स्थापित

उत्तर भिंतीवर हिंदू धर्मीय धार्मिक शिल्पे कोरलेली आहेत –

देव–दानव समुद्रमंथन दृश्य, तसेच रावण कैलास पर्वत उचलत आहे हे रावणानुग्रह शिल्प.

दक्षिण भिंतीवर –

वराह, मल्ल, नागदेवता, वामन अवतार, नरसिंह, कृष्ण, राम, कार्तिकेय, गणेश यांची शिल्पे कोरलेली आहेत.

जैन लेणे :

या परिसरातील एक जैन लेणे इसवी सनाच्या ९व्या शतकात जैन धर्मीय बांधवांनी खोदले आहे.

सद्यस्थिती व संवर्धन :

लेणी समूहातील अनेक लेणी जीर्ण अवस्थेत आहेत. काळाच्या ओघात व ठिसूळ, सच्छिद्र दगडामुळे अनेक शिल्पे अस्पष्ट झाली आहेत.

दुमजली लेण्यांकडे जाण्यासाठी पायरी मार्ग असून काही ठिकाणी तो तुटलेला असून दुरुस्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ, राज्य शासन, पुरातत्त्व विभाग व स्थानिक लोकांच्या सहकार्याने लेण्यांचा जीर्णोद्धार व पर्यटन विकास सुरू आहे.

इतर धार्मिक व ऐतिहासिक स्थळे :

खरोसा लेणी (Kharosa Leni, Maharashtra)

खरोसा लेणी (Kharosa Leni, Maharashtra)


रेणुका माता मंदिर :

लेणी समूह असलेल्या डोंगराच्या विरुद्ध बाजूस देवी रेणुका मातेचे मंदिर आहे.

दर्गा :

या परिसरात एक दर्गा असून तो मुस्लिम बांधवांच्या श्रद्धेचे केंद्र आहे.

औसा किल्ला :

खरोसा लेणी (Kharosa Leni, Maharashtra)

खरोसा लेणी (Kharosa Leni, Maharashtra)

खरोसा लेणी (Kharosa Leni, Maharashtra)


लेणी समूहाजवळील औसा गावाजवळ एक प्राचीन ऐतिहासिक किल्ला आहे.

निलंगेश्वर मंदिर :

खरोसा लेणी (Kharosa Leni, Maharashtra)


निलंगा गावातील प्राचीन शैव मंदिर. उत्कृष्ट बांधणीमुळे पाहणाऱ्याचे मन प्रसन्न होते.

किल्ले भ्रमंतीवेळी अनेक वस्तू लागतात. त्या तुम्ही खालील वेबसाईटच्या आधारे पाहू शकता. खरेदी करू शकता.

• ट्रॅव्हल श्याक /Tripole Aur Trekking and Travel Rucksack

👉https://amzn.to/4rDgX2V

• ट्रेकिंग शूज/ Trekking shoes / Hiking shoes

👉 https://amzn.to/4uyIUeZ

• टोपी / Sun Cap / hat :

👉 https://amzn.to/4bRniDe

• कॅमेरा / Action Camera :

👉 https://amzn.to/4biTU90

• सेल्फी स्टिक/ Selfie stick. :

👉 https://amzn.to/4bGETNg

• बॅटरी/ LED Headlamp / Torch :

👉https://amzn.to/4bNNUoN

• रोहन दोरी /Climbing rope :

👉https://amzn.to/41bmO4P

• कॅरेबिनर हुक/ Carabiner Hooks :

👉 https://amzn.to/4uDMC7i

• फर्स्ट अँड कीट /First Aid kit :

👉https://amzn.to/4bx27VF

• कॅम्पिंग टेन्ट /Camping Tent :

👉https://amzn.to/47bm973

• झोपण्याची बॅग / Sleeping Bag :

👉 https://amzn.to/40IDYqn

खरोसा लेणी समूह – ऐतिहा

सिक माहिती :

खरोसा लेणी (Kharosa Leni, Maharashtra)

खरोसा लेणी (Kharosa Leni, Maharashtra)


खरोसा लेणी ही त्रिधर्मीय लेणी आहेत.

बौद्ध लेणी ही हीनयान पंथाच्या काळात, इसवी सनाच्या ५व्या व ६व्या शतकात खोदली गेली. नंतर महायान पंथीयांनी येथे बुद्ध मूर्ती स्थापित केल्या. पूर्वी येथे स्तूप होते.

हिंदू (शैव) लेणी ही चालुक्य राजवटीच्या काळात, इसवी सनाच्या ६व्या ते ८व्या शतकात खोदली गेली.

जैन लेणी ही जैन लेणी संशोधक विराज शहा यांच्या मते इसवी सनाच्या ९व्या शतकात खोदली गेली.

इसवी सन १८८५ ते १९०१ या काळात जेम्स बर्जेस यांच्या नेतृत्वाखाली या लेण्यांचा शोध घेऊन त्या लोकांसमोर आणल्या गेल्या.

इसवी सन १९४७ नंतर भारत स्वतंत्र झाल्यावर या लेण्या भारत सरकारच्या ताब्यात आल्या.

पुढे या लेण्या पुरातत्त्व विभागाकडे सुपूर्द करण्यात आल्या.

अलीकडे या लेण्यांचा पर्यटनदृष्ट्या विकास करताना त्यांचे पुरातत्त्वीय स्वरूप जपून जीर्णोद्धार करण्यात येत आहे.

अशी आहे खरोसा लेणी समूह विषयी सविस्तर व ऐतिहासिक माहिती.

खरोसा लेणी (Kharosa Leni, Maharashtra)


खरोसा लेणी (Kharosa Leni, Maharashtra)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ही एक वैयक्तिक माहितीपर वेबसाईट आहे. येथे दिलेली माहिती अभ्यास व संदर्भासाठी आहे.
अधिकृत माहितीसाठी संबंधित सरकारी संकेतस्थळ पाहावे.

कुडे लेणी/ kude leni

  कुडे लेणी/ kude leni स्थान :  महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यात रोहा तालुक्यात कुडा लेणी आहेत. इंदापूर पासून मुरुड जंजीरा मार्गावर आ...