crossorigin='anonymous' src='https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-1553308877182847'/> महाराष्ट्र किल्ले व स्थळे यांची माहिती Forts and places in maharashtra: गोंधेश्वर मंदिर – प्राचीन शिव मंदिराचे वैभवशाली ठिकाण Gondeshvar mandir mahiti marathi madhe

रविवार, १८ जानेवारी, २०२६

गोंधेश्वर मंदिर – प्राचीन शिव मंदिराचे वैभवशाली ठिकाण Gondeshvar mandir mahiti marathi madhe

 🌺 गोंधेश्वर मंदिर – प्राचीन शिव मंदिराचे वैभवशाली ठिकाण

Gondeshvar mandir mahiti marathi madhe 

गोंधेश्वर मंदिर – प्राचीन शिव मंदिराचे वैभवशाली ठिकाण  Gondeshvar mandir mahiti marathi madhe


गोंधेश्वर मंदिर हे महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्हा, सिन्नर शहराजवळील ऐतिहासिक आणि धार्मिकरित्या महत्त्वाचे शिव मंदिर आहे. हे मंदिर ११व्या–१२व्या शतकात यादव (Seuna-Yadava) राजवटीतील काळात बांधले गेले आहे आणि ते हेमाडपंती / भूमिज शैलीतील अप्रतिम वास्तुकलेचे उदाहरण मानले जाते.

🛕 गोंडेश्वर मंदिराचा विस्तृत परिसर

सिन्नर येथे असलेले प्राचीन गोंडेश्वर मंदिर परिसरात प्रवेश करताच आपल्याला मंदिराचा भव्य व विस्तृत आवार पाहायला मिळतो. मंदिरास उत्तर, दक्षिण व पूर्व अशा तीन दिशांना प्रवेशद्वारे आहेत. मंदिराच्या बाहेरील बाजूस मजबूत व विस्तृत तटबंदी असून, आतील आवार प्रशस्त आहे.

या आवाराच्या मध्यभागी असलेल्या प्रांगणात १२५ फूट लांब व ९५ फूट रुंद अशा चौथऱ्यावर शिवपंचायतन गोंडेश्वर मंदिर बांधण्यात आलेले आहे. मंदिर समूहाची रचना पाहिल्यास तत्कालीन स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना दिसून येतो.

🚪 दक्षिण प्रवेशद्वार

मंदिराच्या दक्षिण बाजूस अत्यंत देखणे व शिल्पकलेने नटलेले प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या बाहेरील बाजूस खांबांना संलग्न अशी बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे.

प्रवेशद्वाराच्या चौकटीच्या दोन्ही बाजूंना सूरसुंदरींची शिल्पे कोरलेली असून, वरच्या शीर्षभागातील ललाटबिंबावर गणेशमूर्ती कोरलेली आहे. आद्य वंदनीय गणेशाचे नमन करूनच मंदिरात प्रवेश व्हावा, या भावनेतून ही रचना केलेली असावी.

चौकटीच्या बाजूंना सुंदर नक्षीकाम दिसून येते. बाहेरील बाजूस खांब असून, त्यावर घुमटाकृती छत आहे. या छतावर सुरेख नक्षीकाम व आकर्षक कीर्तिमुखे कोरलेली आहेत.

कीर्तिमुख म्हणजे मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांच्या पापांचे दहन करणारी, चिंता, ताण व रोष नष्ट करून प्रसन्नता देणारी, तसेच वाईट शक्तींना चांगल्यात रूपांतरित करणारी देव–दानव संमिश्र कलाकृती होय.

गोंधेश्वर मंदिर – प्राचीन शिव मंदिराचे वैभवशाली ठिकाण  Gondeshvar mandir mahiti marathi madhe


• भ्रमंतीवेळी अनेक वस्तू लागतात. त्या तुम्ही खालील वेबसाईटच्या आधारे पाहू शकता. खरेदी करू शकता.
• ट्रॅव्हल श्याक /Tripole Aur Trekking and Travel Rucksack
👉https://amzn.to/4rDgX2V
• ट्रेकिंग शूज/ Trekking shoes / Hiking shoes
👉 https://amzn.to/4uyIUeZ
• टोपी / Sun Cap / hat :
👉 https://amzn.to/4bRniDe
• कॅमेरा / Action Camera :
👉 https://amzn.to/4biTU90
• सेल्फी स्टिक/ Selfie stick. :
👉 https://amzn.to/4bGETNg
• बॅटरी/ LED Headlamp / Torch :
👉https://amzn.to/4bNNUoN
• रोहन दोरी /Climbing rope :
👉https://amzn.to/41bmO4P
• कॅरेबिनर हुक/ Carabiner Hooks :
👉 https://amzn.to/4uDMC7i
• फर्स्ट अँड कीट /First Aid kit :
👉https://amzn.to/4bx27VF
• कॅम्पिंग टेन्ट /Camping Tent :
👉https://amzn.to/47bm973
• झोपण्याची बॅग / Sleeping Bag :
👉 https://amzn.to/40IDYqn
• दुर्बीण /Telescope
👉 https://amzn.to/4snpwQS

🌿 विस्तृत मंदिर आवार

प्रवेशद्वारातून आत आल्यानं

तर सुंदर व स्वच्छ असे विस्तृत आवार दिसते. संपूर्ण परिसरात फरसबंदी करण्यात आलेली असून, दोन्ही बाजूंना शोभिवंत झाडे लावलेली आहेत. याच रस्त्याने पुढे गेल्यावर आपल्याला संपूर्ण मंदिर समूहाचे भव्य दर्शन घडते.

गोंधेश्वर मंदिर – प्राचीन शिव मंदिराचे वैभवशाली ठिकाण  Gondeshvar mandir mahiti marathi madhe


🌅 स्वर्गमंडप – पूर्वाभिमुख प्रवेशद्वार

मंदिराचे पूर्व दिशेचे प्रवेशद्वार हिंदू धर्मात विशेष महत्त्वाचे मानले जाते. पूर्व दिशा म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारी, उगवत्या सूर्याची दिशा. येथे आपल्याला सुंदर स्वर्गमंडपाची रचना पाहायला मिळते.

खांबांवर उभारलेली ही वास्तू रचना अत्यंत देखणी आहे. कुशू व खोबण्यांवर सुंदर नक्षीकाम करून सांधा-अडक पद्धतीने भिंती उभारलेल्या आहेत. वरच्या बाजूस सूर्यप्रकाश व चंद्रप्रकाश यासाठी वर्तुळाकार खुली जागा ठेवलेली आहे.

या रचनेमुळे स्थापत्यकलेचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. प्रवेशकमानीवर दगडात कोरलेल्या बारीक नक्षीतील नर्तिका, गायक व वादकांच्या मूर्ती पाहणाऱ्याचे मन आकर्षित करतात.

गोंधेश्वर मंदिर – प्राचीन शिव मंदिराचे वैभवशाली ठिकाण  Gondeshvar mandir mahiti marathi madhe

गोंधेश्वर मंदिर – प्राचीन शिव मंदिराचे वैभवशाली ठिकाण  Gondeshvar mandir mahiti marathi madhe


🐘 गणेश मंदिर

मंदिर परिसराच्या नैऋत्य (South-West) दिशेला गणेश मंदिर आहे.

हे मंदिर इतर मंदिरांचे लघुरूप आहे. बाहेरील बाजूस स्तंभ व गर्भगृह असलेली रचना असून त्यावर सुंदर नक्षीपट्ट्या कोरलेल्या आहेत.

पायऱ्या चढल्यानंतर बाह्य मंडप लागतो. येथे अनेक कीर्तीमुखे, फुलांच्या वेलांची नक्षी, वरील बाजूस सुंदर पुष्प नक्षी असलेला घुमट आहे.

गर्भगृहाच्या चौकटीवर द्वारपाल व द्वारपालिका कोरलेले आहेत.

तसेच शंख, चक्र व गदा धारण केलेला विष्णू देवतेचा शिल्पांकित आकृतीबंध दिसतो. आतील गर्भगृहात श्री गणेशाची मूर्ती विराजमान आहे.

गोंधेश्वर मंदिर – प्राचीन शिव मंदिराचे वैभवशाली ठिकाण  Gondeshvar mandir mahiti marathi madhe


🐂 नंदीमंडप :

मुख्य मंदिरासमोर चार खांबांवर उभारलेला नंदीमंडप आहे. या खांबांवर नर्तिका, गायक व वादक यांच्या अत्यंत सजीव व कलात्मक मूर्ती चारही बाजूंनी कोरलेल्या आहेत.

या मूर्तींवर सुरेख अलंकार, कंबरपट्टा, पायात तोडे यांचे तपशीलवार कोरीव काम दिसते. नंदीच्या गळ्यात घंट्यांची माळ असून, पाठीमागील वशिंड्याची गुंफण आकर्षक आहे. येथेही सुंदर कीर्तिमुखांची शिल्पे आढळतात.

नंदीमंडपावर घुमटाकृती हेमाडपंथी बांधणीचा कलश असून, हे बांधकाम शुष्क सांधा युक्त पद्धतीने, छिन्नी व हातोड्याच्या सहाय्याने केलेले आहे. नंदीमंडपाबाहेर एक विशाल शिवलिंग असून, बाजूस काही भग्न मूर्तींचे अवशेषही पाहायला मिळतात.

गोंधेश्वर मंदिर – प्राचीन शिव मंदिराचे वैभवशाली ठिकाण  Gondeshvar mandir mahiti marathi madhe

गोंधेश्वर मंदिर – प्राचीन शिव मंदिराचे वैभवशाली ठिकाण  Gondeshvar mandir mahiti marathi madhe

गोंधेश्वर मंदिर – प्राचीन शिव मंदिराचे वैभवशाली ठिकाण  Gondeshvar mandir mahiti marathi madhe

गोंधेश्वर मंदिर – प्राचीन शिव मंदिराचे वैभवशाली ठिकाण  Gondeshvar mandir mahiti marathi madhe

गोंधेश्वर मंदिर – प्राचीन शिव मंदिराचे वैभवशाली ठिकाण  Gondeshvar mandir mahiti marathi madhe

गोंधेश्वर मंदिर – प्राचीन शिव मंदिराचे वैभवशाली ठिकाण  Gondeshvar mandir mahiti marathi madhe

गोंधेश्वर मंदिर – प्राचीन शिव मंदिराचे वैभवशाली ठिकाण  Gondeshvar mandir mahiti marathi madhe


शिवमंदिर

नंदीमंडपासमोर मध्यभागी भव्य असे शिवमंदिर उभे आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर सुरेख नक्षीकाम असलेले स्तंभ असून, बाहेरील भागात जागोजागी कीर्तिमुखांची कोरीव रचना दिसून येते. प्रवेशद्वाराभोवती व्याल शिल्पे कोरलेली असून, त्यांच्या पायाखाली दबलेले हत्तीशिल्प सामर्थ्याचे प्रतीक आहे. द्वाराशी बारीक नक्षीकाम केलेले द्वारपाल व द्वारपालिका असून, भैरव व चक्रधर विष्णूची शिल्पे प्रवेशद्वाराला विशेष आकर्षण देतात. या शिल्पांवरील वस्त्रे व अलंकार तत्कालीन वैभव व संस्कृतीची ओळख करून देतात. प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबावर गणेश शिल्प कोरलेले आहे. मंदिराच्या आत प्रशस्त सभामंडप असून, त्याच्या छतावर सुंदर पुष्परचना कोरलेली आहे.

सभामंडप

सभामंडपात चार खांब असून प्रत्येक खांबावर वैशिष्ट्यपूर्ण शिल्पकला पाहायला मिळते. पहिल्या खांबावर सुरसुंदरी, श्रीकृष्ण, वामन व नरसिंह अवतारांची शिल्पे कोरलेली आहेत. दुसऱ्या खांबावर गजलक्ष्मी व गणपतीची शिल्पे आहेत. तिसऱ्या खांबावर पिंडदान करणाऱ्या विधीचे शिल्पांकन करण्यात आले आहे, तर चौथ्या खांबावर सुरसुंदरी व इतर धार्मिक शिल्पे कोरलेली आहेत. सभामंडपाच्या आजूबाजूला गंधर्व, महाभारत व रामायणकालीन दृश्ये, बाली–सुग्रीव युद्धप्रसंग, वाद्य वाजवणारे व नृत्य करणारे कलाकार तसेच कीर्तिमुखांची सुंदर कोरीव कामे दिसतात. सभामंडपाच्या जमिनीवर कासव शिल्प कोरलेले आहे.

अंतराळ

सभामंडपाच्या पुढील भागात अंतराळ असून, त्याच्या बाजूच्या भिंतींमध्ये देवकोष्टके आहेत. ही देवकोष्टके सूक्ष्म व आकर्षक नक्षीकामाने अलंकृत करण्यात आलेली आहेत.

गर्भगृह

मंदिराचा सर्वात पवित्र व अंतर्गत भाग म्हणजे गर्भगृह. गर्भगृहाच्या चौकटीवर सुंदर नक्षीदार पट्टिका कोरलेल्या आहेत. खालील बाजूस द्वारपाल व द्वारपालिका असून, विष्णुशिल्प गदा व चक्र धारण केलेल्या अवस्थेत दाखवले आहे. द्वारपालिकांनी चवरे धरून सेवा करत असल्याची रचना कोरलेली आहे. गर्भगृहात शिवपिंड असून त्यावर अखंड जलाभिषेक होत असल्याचे दर्शन घडते. गर्भगृहाच्या कलशावर सुरेख कमलपुष्प नक्षी कोरलेली आहे. बाहेरील नंदीमंडपातून येणाऱ्या सूर्यकिरणांमुळे थेट गाभाऱ्यात प्रकाश पोहोचतो. शिवपिंडीची सावली भिंतीवर पडून संपूर्ण मंदिर सूर्यप्रकाशाने उजळून निघते.

बाह्य रचना

मंदिराच्या बाहेरील भागात खालच्या बाजूस आयताकृती व चौकोनी कडी रचना दिसते. या भागावर हत्तीशिल्पे कोरलेली असून, हत्ती मंदिर उचलून धरल्याप्रमाणे दाखवले आहेत, जे वैभवाचे प्रतीक मानले जाते. वरच्या बाजूस सुरसुंदरी, नृत्यसुंदरी तसेच मध्यभागी देवी-देवतांची शिल्पे कोरलेली आहेत. मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधलेले असून, खालच्या दगडात खाच-सांधा व द्रोणी पद्धत, तर वरच्या दगडात एका बाजूस खुंटी व दुसऱ्या बाजूस खाच अशी रचना करून उत्कृष्ट बांधकाम केलेले आहे. सूर्य व चंद्राच्या प्रकाश-छायांचा विचार करून केलेली प्रकाशयोजना ही स्थापत्यकलेची अप्रतिम कलाकृती आहे. मंदिरावर भूमिज प्रकारची शिखर योजना स्पष्टपणे दिसून येते.


🔱 मंदिर संकुलातील स्थापत्य व शिल्पवैशिष्ट्ये

🕉️ मकरमुख प्रणाली (प्रणाल / जलनिस्सारण व्यवस्था)

शिवलिंगावर अर्पण केलेले जल बाहेर वाहून जाण्यासाठी बाह्य बाजूस मकरमुख प्रणाली कोरलेली आहे. मकरमुख हे गंगा नदीचे वाहन मानले जाते.

या वैशिष्ट्यावरून हे मंदिर इसवी सन १००० पूर्वीचे असावे, असे अभ्यासक मानतात.

कारण गोमुख बसवण्याची परंपरा १२व्या शतकानंतरच्या मंदिरांमध्ये आढळते. मकर प्रणाली ही बांधकाम शैली उत्तर भारतातील तसेच कंबोडिया येथील मंदिरांमध्ये दिसून येते. मंदिरावर पडणारे पावसाचे व अभिषेकाचे पाणी योग्य प्रकारे वाहून नेण्यासाठी अशी यांत्रिक रचना केली जाते. येथे जलवहनाच्या ठिकाणी मकरमुख शिल्प असून त्यावर चतुर्भुज देवीचे शिल्प कोरलेले आहे.

गोंधेश्वर मंदिर – प्राचीन शिव मंदिराचे वैभवशाली ठिकाण  Gondeshvar mandir mahiti marathi madhe

गोंधेश्वर मंदिर – प्राचीन शिव मंदिराचे वैभवशाली ठिकाण  Gondeshvar mandir mahiti marathi madhe

गोंधेश्वर मंदिर – प्राचीन शिव मंदिराचे वैभवशाली ठिकाण  Gondeshvar mandir mahiti marathi madhe

गोंधेश्वर मंदिर – प्राचीन शिव मंदिराचे वैभवशाली ठिकाण  Gondeshvar mandir mahiti marathi madhe


🌺 पार्वती / दुर्गा मंदिर

मंदिराच्या वायव्य (North-West) दिशेला पार्वती / दुर्गा मंदिर स्थित आहे.

प्रवेशद्वारी चार स्तंभ असून त्यावर सुंदर नक्षीकाम व अनेक कीर्तीमुखे कोरलेली आहेत. बाहेरील बाजूस बैठक व्यवस्था आहे. गर्भगृहाच्या चौकटीवर विविध प्रकारच्या नक्षीपट्ट्या कोरलेल्या दिसतात.  प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना द्वारपाल व द्वारपालिका आहेत. चवरे घेतलेल्या द्वारपालिका तसेच पाण्याची चामडी पिशवी घेऊन पाणी शिंपणारा प्रतिहारी कोरलेला आहे. गर्भगृहाच्या ललाटबिंबावर गणेश शिल्प आहे.उंबरठ्याखाली दोन कीर्तीमुखे कोरलेली आहेत. खालील बाजूस रांगोळी करण्यासाठी दगडी व्यवस्था आहे.

आतील गर्भगृहात काळ्या पाषाणात कोरलेली देवी महिषासुरमर्दिनीची मूर्ती आहे. देवीच्या एका हातात तलवार, दुसऱ्या हातात त्रिशूळ,डाव्या हातात ढाल असून पायाखाली महिषासुर दर्शविला आहे. शिखराच्या अंतराळ भागात कमळपुष्प नक्षी कोरलेली आहे. मंदिराच्या बाहेरील भागात खाली चौथरे, त्यावर गजशिल्पे, त्यावर नक्षीदार चौकटी व त्यामध्ये गणेश शिल्पे कोरलेली आहेत. अनेक ठिकाणी सूरसुंदरी व नर्तिका शिल्पे आढळतात.जागोजागी देवकोष्टके कोरलेली आहेत. एकावर एक दगड कूस व खोबणीत बसवून, शुष्क सांधा पद्धतीने भिंती उभारलेल्या आहेत. वर अनेक शिखरांची रचना असून उंच गोपुरे हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे.

☀️ सूर्य मंदिर

इतर मंदिरांप्रमाणेच ईशान्य (North-East) दिशेला सूर्य मंदिर स्थित आहे.

या मंदिरालाही बाह्य प्रवेश, शिखर व गर्भगृहाची रचना आहे.

बाह्य बाजूस नक्षीदार दारचौकट,सूरसुंदरी,  नर्तिका शिल्पे कोरलेली आहेत.

अनेक कीर्तीमुखे सुद्धा येथे दिसून येतात. गर्भगृहात सूर्यदेवतेची मूर्ती प्रतिष्ठित आहे.

🕉️ विष्णू मंदिर

आग्नेय (South-East) दिशेला विष्णू मंदिर आहे.

बाह्य प्रवेशद्वारावर सुंदर नक्षीकाम केलेले स्तंभ आहेत.

गर्भगृहातही उत्कृष्ट शिल्पकला पाहायला मिळते.

गाभाऱ्यात हातात चक्र धारण केलेले, गदा धारण केलेले श्री विष्णुदेव विराजमान आहेत

गोंधेश्वर महादेव मंदिराची ऐतिहासिक व स्थापत्य माहिती

🔹 पुष्करणी

- मंदिराच्या पूर्व दिशेला एक प्रशस्त तलाव असून त्यास पुष्करणी असे म्हणतात.

- या पुष्करणीतील दगडांचा वापर गोंधेश्वर मंदिराच्या बांधकामासाठी करण्यात आलेला आहे.

- त्यामुळे मंदिर व पुष्करणी यांचे नाते स्थापत्यदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे मानले जाते.

गोंधेश्वर मंदिर – प्राचीन शिव मंदिराचे वैभवशाली ठिकाण  Gondeshvar mandir mahiti marathi madhe

गोंधेश्वर मंदिर – प्राचीन शिव मंदिराचे वैभवशाली ठिकाण  Gondeshvar mandir mahiti marathi madhe

गोंधेश्वर मंदिर – प्राचीन शिव मंदिराचे वैभवशाली ठिकाण  Gondeshvar mandir mahiti marathi madhe


कीर्तिमुख व व्याल शिल्पे – थोडक्यात माहिती

🔹 कीर्तिमुख

कीर्तिमुख म्हणजे फक्त मुख असलेले भयावह शिल्प. हे शिल्प प्रामुख्याने मंदिरांच्या प्रवेशद्वारावर, ललाटबिंबावर किंवा कळसाखाली कोरलेले आढळते.

याचा अर्थ “यशाचे/कीर्तीचे मुख” असा होतो.

 कीर्तिमुख शिल्प दुष्ट शक्तींना दूर ठेवणारे, मंदिराचे रक्षण करणारे आणि शुभतेचे प्रतीक मानले जाते. हिंदू मंदिर स्थापत्यात हे एक महत्त्वाचे रक्षणात्मक शिल्प आहे.

🔹 व्याल शिल्प

व्याल हे काल्पनिक प्राणी असून ते सिंह, हत्ती, घोडा किंवा इतर पशूंच्या मिश्र रूपात दाखवले जातात.

व्याल शिल्पे प्रामुख्याने मंदिरांच्या बाह्य भिंतींवर, स्तंभांवर किंवा चौकटींवर कोरलेली असतात.

ही शिल्पे शक्ती, पराक्रम, संरक्षण आणि भयदर्शकता दर्शवतात.

शत्रू व नकारात्मक शक्तींना रोखण्याचे प्रतीक म्हणून व्याल शिल्पांचा उपयोग केला जातो.

👉 दोन्ही शिल्पे भारतीय मंदिर स्थापत्यातील सौंदर्य, प्रतीकात्मकता आणि धार्मिक श्रद्धा दर्शवणारी महत्त्वाची घटक आहेत.

🔹 सिन्नर नगरीची ऐतिहासिक पार्श्वभूमी

- सिन्नर नगराबाबत अशी आख्यायिका प्रचलित आहे की बाणासुर राक्षसाने उलथून टाकलेली नगरी म्हणजेच सिन्नर.

- या नगराला इतिहासकाळात विविध नावे होती :

   - सिंधी नगरी, सेनुनापूर, श्रीनगर, नंतर सिन्नर

- यादव राजा सेऊ न चंद्र याने वसवलेली नगरी असा उल्लेखही इतिहासात आढळतो.

🔹 यादवकालीन राजकीय घडामोडी

- इसवी सन ११७५ मध्ये चालुक्यांचे मांडलिक सरदार म्हणून यादव प्रभावी झाले.

- भिल्लम यादव दुसरा याने देवगिरी ते नाशिक असा राज्यविस्तार केला.

- १२ व्या शतकात काही काळ सिन्नर ही यादवांची राजधानी होती.

- यादव राजा गोविंदचंद्र यांच्या काळात गोंधेश्वर महादेव मंदिराची उभारणी करण्यात आली.

- या नगरावर सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट व यादव अशा विविध राजवटींचे अधिपत्य राहिले.

- पुढे पेशवेकाळापर्यंत सिन्नर हे राजकीय, सामाजिक व आर्थिक सत्तेचे महत्त्वाचे केंद्र होते

राष्ट्रीय संरक्षित स्मारक: भारत सरकारने हे मंदिर ४ मार्च १९०९ रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे, जे स्थापत्य आणि ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत मौल्यवान आहे. 

🔹 मंदिराचा प्रकार व देवता

- गोंधेश्वर महादेव मंदिर हे शिव पंचायतन मंदिर आहे.

- मुख्य शिवमंदिरासोबत खालील देवतांची मंदिरे येथे आहेत :

   - गणेश,  शिव, पार्वती, विष्णू, सूर्य

🔹 स्थापत्य व बांधकाम पद्धत

- मंदिराच्या बांधकामासाठी शेजारील पुष्करणीतील दगड वापरण्यात आले आहेत.

- बांधकामात शुष्क सांधा पद्धत (Dry Masonry) वापरलेली आहे.

- दगडांना नर-मादी पद्धतीने एकमेकांत घट्ट अडकवून रचना उभी करण्यात आली आहे.

- मंदिरातील शिल्पांमध्ये कीर्तिमुख व व्याल शिल्पांची समृद्ध मांडणी आढळते.

- वापरलेला दगड हा गुलाबी व्हेसिक्युलर खडक प्रकारचा असून, कालौघात अनेक शिल्पांची झीज झालेली दिसते.

- तरीही शिल्परचना अतिशय उत्कृष्ट असून तत्कालीन वैभवशाली पोशाख, केशरचना व अलंकारांची माहिती देणारी आहे.

गोंधेश्वर मंदिर – प्राचीन शिव मंदिराचे वैभवशाली ठिकाण  Gondeshvar mandir mahiti marathi madhe

गोंधेश्वर मंदिर – प्राचीन शिव मंदिराचे वैभवशाली ठिकाण  Gondeshvar mandir mahiti marathi madhe

गोंधेश्वर मंदिर – प्राचीन शिव मंदिराचे वैभवशाली ठिकाण  Gondeshvar mandir mahiti marathi madhe

गोंधेश्वर मंदिर – प्राचीन शिव मंदिराचे वैभवशाली ठिकाण  Gondeshvar mandir mahiti marathi madhe


🔹 धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व

- मौनिनाथ यांनी लिहिलेल्या चरित्रात या स्थळाचा ब्रह्मपुरी असा उल्लेख आढळतो.

- महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी येथे येऊन गेल्यामुळे या स्थळास विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

- त्यामुळे दरवर्षी अनेक महानुभाव पंथाचे अनुयायी येथे दर्शनासाठी येतात.

🔹 छाया-प्रकाश योजना (Solar Alignment)

- या मंदिरात छाया-प्रकाश योजनेची अप्रतिम रचना पाहायला मिळते.

- सूर्योदयाच्या वेळी सूर्यकिरण थेट गाभाऱ्यापर्यंत पोहोचतात.

- सूर्याच्या उत्तरायण व दक्षिणायन स्थितीनुसार वेळेत थोडा फरक पडतो.

- यावरून मंदिर बांधताना दिशा ज्ञान व स्थापत्य कलेचा अत्यंत कुशल वापर झाल्याचे स्पष्ट होते.

धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व (Religious Significance)

गोंधेश्वर मंदिर हे महादेवाच्या भक्तांसाठी अत्यंत पवित्र स्थान आहे:

🔹 महाशिवरात्र आणि सावन महिन्यात यांनी येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात.

🔹 हे मंदिर शिवभक्तांसाठी एक शक्तिपीठ म्हणून आदरपूर्वक पाहिले जाते.

🔹 विद्यार्थ्यांकडून सूर्यपूजन, योग आणि सूर्यनमस्कार इथे होत आहेत — ज्यामुळे क्रीडा आणि आरोग्याशी संबंधितही काही उपक्रम होत असतात.

गोंधेश्वर मंदिर – प्राचीन शिव मंदिराचे वैभवशाली ठिकाण  Gondeshvar mandir mahiti marathi madhe

गोंधेश्वर मंदिर – प्राचीन शिव मंदिराचे वैभवशाली ठिकाण  Gondeshvar mandir mahiti marathi madhe


📍 ठिकाण आणि कसे जायचे (Location)

📌 स्थान: सिन्नर, नाशिक जिल्हा, महाराष्ट्र — नाशिक शहरापासून सुमारे २५–३० किमी अंतरावर आहे. 

📍 पुणे आणि मुंबईपासूनही ही यात्रा रस्ता मार्गे सोयीस्कर आहे.

✈️ नजीकचे रेल्वे स्टेशन: नाशिक रोड

🚌 बस / टॅक्सी सेवा: सिन्नर स्टेशनपासून मंदिरापर्यंत सहज उपलब्ध.


📸 भेट देण्याचा अनुभव (Visitor Experience)

गोंधेश्वर मंदिर कदाचित लोकप्रिय ठिकाणाच्या तुलनेत कमी गर्दीचे आहे, त्यामुळे इतिहासप्रेमी आणि शांती शोधणाऱ्या भाविकांसाठी हे एक आदर्श स्थळ आहे. 

सकाळ-संध्याकाळ पर्यंत मंदिर उघडे असते आणि प्रवेश सर्वसामान्यपणे मोफत असतो. 

भेट देताना:

✔️ दगडी नक्षीकाम बघा

✔️ शिवलिंग आणि नंदी मंडपाचे दर्शन

✔️ परिसरातील शांत वातावरणाचा अनुभव

✔️ जवळचील गोंदेश्वर तलाव आणि निसर्ग

📌 निष्कर्ष

🔥 गोंधेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील प्राचीन, स्थापत्यदृष्ट्या समृद्ध आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे शिव मंदिर आहे — जे यादव काळातील स्थापत्याचे उत्कृष्ठ उदाहरण आहे आणि इतिहास, कला आणि अध्यात्म यांचे सुंदर मिश्रण सादर करते. 🔱

गोंधेश्वर मंदिर – प्राचीन शिव मंदिराचे वैभवशाली ठिकाण  Gondeshvar mandir mahiti marathi madhe


 अशी आहे 

गोंधेश्वर मंदिर – प्राचीन शिव मंदिराचे वैभवशाली ठिकाण

Gondeshvar mandir mahiti marathi madhe 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ही एक वैयक्तिक माहितीपर वेबसाईट आहे. येथे दिलेली माहिती अभ्यास व संदर्भासाठी आहे.
अधिकृत माहितीसाठी संबंधित सरकारी संकेतस्थळ पाहावे.

कुडे लेणी/ kude leni

  कुडे लेणी/ kude leni स्थान :  महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यात रोहा तालुक्यात कुडा लेणी आहेत. इंदापूर पासून मुरुड जंजीरा मार्गावर आ...