मंगळवार, १६ डिसेंबर, २०२५

दातेगड / सुंदरगड किल्याची माहिती Dategad / sundargad kilyachi mahiti marathi

 दातेगड / सुंदरगड किल्याची माहिती

Dategad / sundargad kilyachi mahiti marathi

दातेगड / सुंदरगड किल्याची माहिती  Dategad / sundargad kilyachi mahiti marathi

• स्थान :

महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यात सह्याद्री पर्वतात पाटण तालुक्यात घेरा दातेगड हा किल्ला पायथा टोळेवाडी गावाजवळ आहे.

• उंची : या किल्याची समुद्र सपाटीपासून उंची सरासरी ३४२५ फूट आहे.

• सोप्या श्रेणीत हा किल्ला येतो.

दातेगड किल्ला पहायला जाण्यासाठी प्रवासी मार्ग :

दातेगड / सुंदरगड किल्याची माहिती  Dategad / sundargad kilyachi mahiti marathi

सातारा हे जिल्ह्याचे ठिकाण असून ते रस्ते व लोहमार्ग या द्वारे भारतातील अन्य शहरांना जोडलेले आहे.

• पुणे येथून १८० किलोमीटर अंतरावर दातेगड किल्ला आहे.

• मुंबई येथून ३२० किलोमीटर अंतरावर दातेगड किल्ला आहे.

• नाशिक येथून ४०० किलोमीटर अंतरावर दातेगड किल्ला पहायला मिळतो.

• मुंबई – पुणे – सातारा – उंब्रज – मल्हार पेठ – चिपळूण रोडने पाटण येथून पुढे टोळेवाडी पायथा गाव तेथून दाते गडावर जाता येते.

• उंब्रज पासून पाटण २८ किलोमीटर व तेथून टोळेवाडी गाव ५ किलोमीटर अंतरावर आहे. तेथून एक किलोमीटर अंतरावर दातेगड किल्ला आहे.

दातेगड / सुंदरगड किल्याची माहिती  Dategad / sundargad kilyachi mahiti marathi

दातेगडावर पाहण्यायोग्य ठिकाणे :

• पाटण या तालुक्याच्या ठिकाणावरून आपण गडाच्या पायथ्याशी असलेल्या टोळेवाडी गावी पोहोचू शकतो. तेथे एक सुंदरगड नावाने रिसॉर्ट आहे. त्या परिसरात आपले वाहन पार्क करून पायी गडावर पोहोचू शकतो. गडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. दोन्ही मार्ग आपल्याला गडाच्या दरवाजापर्यंत नेऊन पोहोचवतात.

• कात्याळ गुहा :

दातेगड / सुंदरगड किल्याची माहिती  Dategad / sundargad kilyachi mahiti marathi

गडाच्या मुख्य दाराच्या बाहेरील बाजूस आपल्याला जवळच पायवाटेला एक गुहा पाहायला मिळते. ती कात्याळ खडकात खोदून तयार केलेली पहायला मिळते. ती पहारेकऱ्यांना विश्रांती घेण्यासाठी केली असावी. या गुहा खोलीतील आतील बाजूस लहान छिद्रे असणारी लहान पोकळी दिसते. यामध्ये जाणे अवघड आहे. पूर्वी गुप्त मार्ग असो किंवा पावसाळी पाण्याच्या निचऱ्याने तिची निर्मिती झाली असल्याचे जाणवते.

• मुख्य प्रवेशद्वार :

दातेगड / सुंदरगड किल्याची माहिती  Dategad / sundargad kilyachi mahiti marathi

सदरचा गड हा लयन गड प्रकारात येतो. या गडाची निर्मिती प्राचीन अग्निजन्य खडकास छिन्नी हातोडा वापरून नको असलेला भाग काढून तयार केली असल्याचे जाणवते. पायरी चढून थोड वर समोर मुख्य प्रवेशद्वार लागते. खडकात खोदून तयार केलेलं हे जांभ्या रंगाच्या खडकाचे आहे. वरील बाजूस थोडी पडझड झालेली आहे. सध्याच्या रूपावरून तत्कालीन बांधकाम रचना समजून येते. उंबऱ्याखालून पाणी निचरा होण्यासाठी छिद्रे ठेवलेली दिसतात. या दरवाजाने आत प्रवेश करता येतो.

दातेगड / सुंदरगड किल्याची माहिती  Dategad / sundargad kilyachi mahiti marathi

• पहारेकरी देवड्या :

दातेगड / सुंदरगड किल्याची माहिती  Dategad / sundargad kilyachi mahiti marathi

दातेगड / सुंदरगड किल्याची माहिती  Dategad / sundargad kilyachi mahiti marathi

दरवाजा बाजूला खोदून केलेल्या देवड्या पहायला मिळतात. इतर गडाप्रमाणे या ही गडावर त्यांची रचना दिसते. पहारा देत असलेल्या सैनिकांना विश्रांतीसाठी त्या खोदल्याचे दिसतात.

दातेगड / सुंदरगड किल्याची माहिती  Dategad / sundargad kilyachi mahiti marathi
ओसरी 

• ढाळज :

 दरवाजातून आत आल्यावर आपल्याला ढाळज लागते. ही ढळज ही विस्तृत अशी आहे. जेथून आपल्याला गडाच्या वरील भागात जाता येते. या ढाळजे मध्ये आपणास गणेश व हनुमंत या हिंदू देवतेच्या मूर्ती पाहायला मिळतात.

• हनुमंत ( दक्षिण मुखी मारुती ) शिल्प लयन मूर्ती :

दातेगड / सुंदरगड किल्याची माहिती  Dategad / sundargad kilyachi mahiti marathi

किल्याच्या ढाळजे मध्ये आपल्याला एक जवळ जवळ बारा फूट उंच कात्याळ भिंतीत खोदून कोरून तयार केलेली लयन वीर हनुमंत मूर्ती पाहायला मिळते. ती शेंदरी रंगात रंगवलेली आहे. हनुमंत म्हणजे अवघड काम सुलभ करणारी देवता. जी वीर शक्तीचे प्रतीक आहे. युद्ध करण्यासाठी जाताना हनुमंत पूजा करतात. म्हणून विजय व अशक्य ते शक्य करणारी देवता म्हणून हनुमंत पूजा केली जाते. ते लयन शिल्प दरवाजातून प्रवेश करताच समोर येते. या मूर्तीवर सूर्य मावळत असताना सूर्य किरणे पडतात.

( लायन म्हणजे दगडी खडकात खोदून तयार केलेली संरचना. )

• गणेश लयन मूर्ती :

दातेगड / सुंदरगड किल्याची माहिती  Dategad / sundargad kilyachi mahiti marathi

हिंदू धर्मात दुःख नष्ट करणारी देवता. व कोणत्याही कार्याचा आरंभ करण्यासाठी आशीर्वाद गणेशाचा घेतला जातो. हनुमंत मूर्ती शेजारील भिंतीवर आपणास गणेश मूर्ती कोरलेली पाहायला मिळते. ही जवळ जवळ ६ ते ७ फूट उंच असावी. मूर्तीचे वैशिष्ट्ये तिचे कान गणेशास प्रिय फुल असणाऱ्या जास्वंदी फुलाच्या रचनेप्रमाणे आहेत.

ही सुद्धा छिन्नी हातोडा वापरून बनवली आहे. सूर्य उगवत असताना या मूर्तीवर किरणे पडतात. असे सुंदर दृश्य येथे दिसून येते.

• कात्याळ खोदीव पायरी मार्ग :

दातेगड / सुंदरगड किल्याची माहिती  Dategad / sundargad kilyachi mahiti marathi

श्री गणेश व हनुमंत देवतेचे दर्शन केल्यावर आपणास एक अग्निजन्य खडकात खोदलेला पायरी मार्ग लागतो. या मार्गानं आपण गडाच्या वरील भागात पोहोचू शकतो. या मार्गानं चढून जाताना आपल्याला ऐक खोदीव लयन गुहा खोली लागते. मावळे तथा सैनिक यांच्या विश्रांतीसाठी ती केली असल्याचे जाणवते.

दातेगड / सुंदरगड किल्याची माहिती  Dategad / sundargad kilyachi mahiti marathi

दातेगड / सुंदरगड किल्याची माहिती  Dategad / sundargad kilyachi mahiti marathi

• तलवारीच्या आकाराची विहीर :

दातेगड / सुंदरगड किल्याची माहिती  Dategad / sundargad kilyachi mahiti marathi

गड माथ्यावर गेल्यावर आपल्याला एक तलवारीच्या आकाराची विहीर लागते. जी अग्निजन्य खडकात खोदलेली दिसून येते. ही विहीर ५० मीटर लांब, ३ मीटर रुंद व ३० मीटर खोल आहे.विहिरीत उतरण्यासाठी जोड पायरी स्वरूपात खुदाई दिसून येते. एका बाजूस मोठ्या आकाराची तर दुसऱ्या बाजूस लहान आकाराची पायरी अशा स्वरूपात उतरण पायऱ्यांची दिसून येते. जस जसे विहिरीत उतरावे तसे शांत, थंडावा जाणवतो गडावरील शिबंदीतील लोकांना पिण्याच्या व खर्चाच्या पाण्याची सोय करण्यासाठी तिची रचना केलेली असल्याचे दिसते. स्थानिक लोक तिला गेरूची विहीर म्हणतात. गेरू म्हणजे घाटी मराठी शब्द याचा अर्थ लाला जांभ्या रंगाची माती होय.

दातेगड / सुंदरगड किल्याची माहिती  Dategad / sundargad kilyachi mahiti marathi

• शिव मंदिर :

दातेगड / सुंदरगड किल्याची माहिती  Dategad / sundargad kilyachi mahiti marathi

दातेगड / सुंदरगड किल्याची माहिती  Dategad / sundargad kilyachi mahiti marathi

विहिरीत आतील बाजूस एक लहान लयन गुहा मंदिर आहे. तिच्यामध्ये आपणास नंदी व महादेव पिंड पहायला मिळते. येथील राजे मुख्य शैव पंथी असल्याने प्रत्येक किल्यावर आपणास शिवमंदिर पहायला मिळते. शिव तिथे गंगा तसेच येथे शिवपिंड व विहिरीतील जल या रूपाने या गोष्टीचा प्रत्यय येतो.

• तटबंदी :

दातेगड / सुंदरगड किल्याची माहिती  Dategad / sundargad kilyachi mahiti marathi

• किल्ल्याला सभोवती उंच तासीव कात्याळ भिंत पहायला मिळते. ही १५ ते २० फूट उंच असून वरील बाजूस बांधकाम करण्यात आले होते. यासाठी किल्ल्याच्या सखल उतारावरील खडकातील चिरे म्हणजेच दगड काढले होते. त्याच्या सहाय्याने येथे बांधकाम केले असल्याचे दिसून येते. ही तटबंदी काही ठिकाणी ढासळली असल्याचे दिसते.

• पाण्याची टाकी :

दातेगड / सुंदरगड किल्याची माहिती  Dategad / sundargad kilyachi mahiti marathi

• किल्यावर जागोजागी सखल भागातील दगड काढून पाण्याची खोल टाकी बनवली असल्याचे दिसून येते. याद्वारे गडावर राहणाऱ्या लोकांची राहण्याची सोय केली गेली असल्याचे दिसून येते.

• सदरेचे अवशेष :

दातेगड / सुंदरगड किल्याची माहिती  Dategad / sundargad kilyachi mahiti marathi

किल्ल्यावर एके ठिकाणी आपणास विस्तृत असे बांधकाम पाहायला मिळते. ही ज्योते असलेली संरचना म्हणजे बैठक सदर असल्याचे जाणवते. ज्याच्या वरील भाग लाकडाचा असतो. काळाच्या ओघात परकीय आक्रमकांनी नासधूस केल्याचे दिसते. आता फक्त अवशेष शिल्लक आहेत. येथे सल्लामसलतीसाठी सभा भरत असावी.

• बांधकाम अवशेष :

दातेगड / सुंदरगड किल्याची माहिती  Dategad / sundargad kilyachi mahiti marathi

येथे जागोजागी अनेक बांधकामाचे अवशेष पाहायला मिळतात. सदरच्या किल्यावर मोठ्या प्रमाणात किल्लेदार, मुख्य अधिकारी, शिबंदीतील सैनिक व कर्मचारी यांच्या राहण्याची सोय करण्यासाठी अनेक ठिकाणी बांधकाम केले गेल्याचे चौथरा अवशेषांवरून जाणवते.

• इतर पाण्याची टाकी :

दातेगड / सुंदरगड किल्याची माहिती  Dategad / sundargad kilyachi mahiti marathi

किल्यावर जागोजागी अनेक सखोल पाण्याची टाकी खोदली असल्याचे पाहायला मिळते. जेथील दगड रहिवासी इमारत तसेच तटबंदी बांधकामात वापरले गेल्याचे जाणवते.

• ध्वज स्तंभ :

दातेगड / सुंदरगड किल्याची माहिती  Dategad / sundargad kilyachi mahiti marathi

• किल्याच्या उंच भागात एके ठिकाणी आपणास ध्वजस्तंभ पहायला मिळतो. ज्यावर हिंदू राज्यधर्माची भगवी पताका फडकताना पहायला मिळते.

अशाप्रकारे फक्त दोन ते तीन तासात गड परिक्रमा होते. व आपण परतीच्या मार्गास लागतो.

दातेगड किल्याची ऐतिहासिक माहिती :

• सदरचा गड हा शिवपूर्व कालीन आहे. पूर्वी या परिसरात असलेल्या शालिवाहन राजवटीच्या काळात किंवा अन्य हिंदू राजवटीत या किल्याची निर्मिती केली असल्याचे बांधकाम रचनेवरून जाणवते.

• सदरच्या गडाचा परिसर प्राचीन विजापूर, कराड , चिपळूण या व्यापारीमार्गावर आहे. तत्कालीन राजांनी घाट मार्गावर वाहतूकीवर नजर ठेवण्यासाठी या परिसरात घेरा दातेगड, जयगड, गुणवंतगड, वसंतगड, सदाशिवगड, या गडांची निर्मिती केली असल्याचे जाणवते.

• इसवी सनाच्या पंधराव्या शतकात शिर्के सरदारांच्या ताब्यात हा किल्ला असावा.

• इसवी सनाच्या १५ व्या शतकात बहामनी सुलतान मल्लिक मुर्तिजा याने हा किल्ला बहामनी सत्तेत अखत्यारीत आणला.

• पुढे हा किल्ला बहामनी सत्तेच्या विघटनाने निर्माण झालेल्या आदिलशहाकडे आला.

• इसवी सन १६५९ साला त अफजलखान वध व जावळी मोहीम फत्ते केल्यावर हा किल्ला स्वराज्यात दाखल केला. शिवरायांनी येथील सुंदर परिसर आवडला व किल्याचे नाव सुंदरगड ठेवले. व सरदार साळुंखे यांच्याकडे हा किल्ला सुपूर्द केला. ते पाटण परिसरात राहत असल्याने त्यांना पाटणकर या नावाने ओळखले जाते.

• इसवी सन १६८९ रोजी संभाजीराजांच्या मृत्यूनंतर हा किल्ला मुघलांनी जिंकून घेतला.

• सरसेनापती संताजी घोरपडे व साळुंखे पाटणकर यांनी पुन्हा हा किल्ला स्वराज्यात आणला. तेव्हा राजाराम महाराज यांनी हा किल्ला व पाटण परिसरातील ३४ गावे इनाम म्हणून पाटणकरांना दिली.

• पुढे हा किल्ला स्वराज्यात राहिला.

• इसवी सन १९१८ सालात मराठा साम्राज्याचा पेशवाईचा अस्त झाला. व दातेगड ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. पुन्हा मराठ्यांनी एकत्र येऊन उठाव करू नये यासाठी इंग्रजांनी इतर किल्ल्याप्रमाणे या किल्ल्यावरील वास्तूंची नासधूस केली.

• पुढे इसवी सन १९४७ सालात भारत स्वतंत्र झाल्यावर हा किल्ला स्वतंत्र भारत सरकारच्या ताब्यात आला.

• सध्या भग्न अवस्थेत असलेल्या या किल्ल्याची पाटण परिसरातील शिवप्रेमी डागडुजी करत आहेत. याचे पुरातत्व टिकवून ठेवत आहेत.

•अशी आहे दातेगड/ सुंदरगड किल्याची माहिती dategad/ sundargad kilyachi mahiti marathi madhe 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

यह एक प्रायव्हेट वेबसाईट हैं l इसमें लिखी हुई जाणकारी के बारे में आप को आशंका हो तो सरकारी साईट को देखकर आप तसल्लई कर सकते हैं l

Vasai Fort (Bassein Fort) – Information in English

  Vasai Fort (Bassein Fort) – Information in English “Invincible fort Janjira, Vasai Fort too fought till unconsciousness, finally the front...