शनिवार, ६ डिसेंबर, २०२५

चामार लेणी / म्हसरूळ लेणी याविषयी माहिती Chamar Leni / mhasrurl leni yavishyi mahiti Marathi madhe.

 चामार लेणी / म्हसरूळ लेणी याविषयी माहिती

Chamar Leni / mhasrurl leni yavishyi mahiti Marathi madhe.

चामार लेणी / म्हसरूळ लेणी याविषयी माहिती  Chamar Leni / mhasrurl leni yavishyi mahiti Marathi madhe.

स्थान :

 महाराष्ट्र राज्यातील नाशिक शहरापासून थोड्याच अंतरावर म्हसरूळ गावापासून जवळच त्रिकोणाकृती डोंगरात चामार लेणी आहेत.

(चुकीचा अर्थबोध चांभार लेणी असा आहे. ही चामार लेणी असे नाव खरे आहे. )

उंची :

डोंगर पायथ्यापासून ४०० फूट उंचीवर चामार लेणी आहेत.

लेणी पहायला जाण्यासाठी प्रवासी मार्ग :

चामार लेणी / म्हसरूळ लेणी याविषयी माहिती  Chamar Leni / mhasrurl leni yavishyi mahiti Marathi madhe.

• नाशिक हे शहर महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाचे औद्योगिक शहर आहे. हे पुणे येथून २१० कि.मी. तर मुंबई येथून १५० किलोमीटर अंतरावर आहे. येथून गुजरात रोड – म्हसरूळ – तवली फाटा - गजपती सिद्धक्षेत्र – रोडने – त्रिकोणी डोंगर पायथा – पायरी मार्गानं चामार लेणी.

• गुजरात कडून येताना सुरत- नवसारी – वलसाड – पारडी - नानापोंढा – कुंभाळे – पींट - तवली फाटा – येथून आपण गजपती सिद्धक्षेत्र रोडने चामार लेणी पहायला जाऊ शकतो.

चामार लेणी परिसरात पाहण्यासारखी ठिकाणे :

नाशिक या जिल्हा ठिकाणी आल्यावर गुजरातकडे जाताना नाशिक – म्हसरूळ मार्गे तवली फाट्यावरून गजपंथ / सिद्धक्षेत्र नावाचे ठिकाण ८ किलोमीटर येथून पुढे डोंगर पायथ्याला गाडी पार्क करून आपण पायरी मार्गाने अथवा पाय वाटेने चामारलेणी पहायला जाऊ शकतो.

• पायरी मार्ग :

चामार लेणी / म्हसरूळ लेणी याविषयी माहिती  Chamar Leni / mhasrurl leni yavishyi mahiti Marathi madhe.

गजपंथ / सिद्धक्षेत्र या स्थानाहून आल्यावर पुढे लेणी समूह असलेल्या त्रिकोणाकृती डोंगराखाली आल्यावर आपण पार्किंग ठिकाणी गाडी लावून थोडे चालत आल्यावर पायरी मार्गापर्यंत पोहोचू शकतो. सुंदर असा हा पायरी मार्ग आहे. दगडी बांधीव असा, या एकूण ४३७ पायऱ्या आहेत. चढताना बाजूला रेलिंग रॉड लावलेले आहेत. जसजसे वर चढत जावे तसं तसे खड्या पायऱ्या लागतात. नेहमी गिर्यारोहण करणाऱ्यांसाठी त्या चढून जाणं सोप वाटेल. पण कधीतरी येणाऱ्यांची दमछाक नक्की होईल.

चामार लेणी / म्हसरूळ लेणी याविषयी माहिती  Chamar Leni / mhasrurl leni yavishyi mahiti Marathi madhe.

• इंद्रदेव व अंबिका मूर्ती :

सुरवातीस लेणी प्रांगणात प्रवेश करताना इंद्रदेव व देवी अंबिका यांच्या सुरेख मूर्ती पाहायला मिळतात.

• नवीन रचना मंदिर :

चामार लेणी / म्हसरूळ लेणी याविषयी माहिती  Chamar Leni / mhasrurl leni yavishyi mahiti Marathi madhe.

लेणी समूहाजवळ आल्यावर तिथे एक गेट लागते. तेथून आत गेल्यावर एक छोटेसे बस्ती मंदिर लागते. जे नवीन बांधलेले असून येथे आपणास अनेक देवड्या पहायला मिळतात. त्यामध्ये जैन धर्माच्या तीर्थंकरांच्या सुंदर शिल्पाकृती पहायला मिळतात.

• ध्वजस्तंभ :

लेणी समूहाबाहेर एक सुंदर कोरीव शिल्पानियुक्त ध्वजस्तंभ पहायला मिळतो. यावर जैन धर्माचे प्रतीक असलेली पताका फडकावण्याचे कार्य जैन धर्म सेवक मुनी करतात.

• पहिली गुहा :

चामार लेणी / म्हसरूळ लेणी याविषयी माहिती  Chamar Leni / mhasrurl leni yavishyi mahiti Marathi madhe.

पहिल्या गुहेत सुंदर जैन मुनिवर पार्श्वनाथ भगवान यांच्या तीन शिल्पमूर्ती पहायला मिळतात. या मूर्ती बैठक रुपात आहेत. मूर्तींच्या चेहऱ्यावर असणारे भाव शांत, शीतल कोणताही मोह नसणारा विरक्त भावमुद्रा दिसून येतात. गुहेच्या बाहेर चंद्रप्रभू भगवान, नेमिनाथ भगवान व आदिनाथ यांच्या सुरेख ध्यानस्थ भावमुद्रा असणाऱ्या मूर्ती आढळतात. सुंदर श्वेत रंगाने रंगवलेला गाभारा व कृष्ण रंगातील शिल्पाकृती उठावदार आहेत. बाजूला यक्ष व यक्षिणी सेवक आहेत. या गुहेचा विस्तार केलेला असून अन्य विभागात बस्ती मंदिर निर्माण केले असून तेथे तीर्थंकरांच्या सुंदर शिल्पाकृती असून तेथे जैन धर्मीय अभिषेक, पूजाविधी व धार्मिक ग्रंथ वाचन केले जाते. तपश्चर्या केली जाते.

चामार लेणी / म्हसरूळ लेणी याविषयी माहिती  Chamar Leni / mhasrurl leni yavishyi mahiti Marathi madhe.

चामार लेणी / म्हसरूळ लेणी याविषयी माहिती  Chamar Leni / mhasrurl leni yavishyi mahiti Marathi madhe.

• दुसरी गुहा :

चामार लेणी / म्हसरूळ लेणी याविषयी माहिती  Chamar Leni / mhasrurl leni yavishyi mahiti Marathi madhe.

ही गुहा विस्तृत आहे. यामध्ये मुख्य गाभाऱ्यात शांतिनाथ भगवान, कुंथुनाथ भगवान, व आरहनाथ भगवान यांच्या मूर्ती आहेत. या देखील सुरेख असून त्या खड्या अवस्थेत सर्व आहेत. पाठीमागील बाजूस सुंदर महिरप पहायला मिळते. मानसिक तणाव दूर करण्यासाठी हे स्थान उपयुक्त आहे.

• तिसरी गुहा :

चामार लेणी / म्हसरूळ लेणी याविषयी माहिती  Chamar Leni / mhasrurl leni yavishyi mahiti Marathi madhe.

तिसऱ्या गुहेत पार्श्वनाथ भगवान यांची सुंदर मूर्ती आहे. ही अकरा फूट उंचीची असून ती पद्मासनात बसलेली ध्यानमग्न अवस्थेत आहे. मूर्तींच्या चेहऱ्यावर शांत भाव असून त्याग, सेवा, शांती, समाधान, तृप्ती हे गुण प्रकट करणारी आहे. या ठिकाणी मनशांती लाभते. येणारा प्रत्येकजण येथे आल्यावर आत्मशांती प्राप्त करतो. अनुभवतो.

• प्रदक्षिणा :

मंदिर लेणी समूहातून बाहेर पडल्यावर आपणास संपूर्ण डोंगर प्रदक्षिणा करता येते.

• तळी व डोंगर माथा :

लेणी समूहापासून थोड्या अंतरावरून डोंगर माथ्यावर जाण्यासाठी असणाऱ्या मार्गानं आपण डोंगर माथ्यावर जाऊ शकतो. तेथे दोन तळी पाहायला मिळतात. तसेच सुंदर नाशिक शहराचे दर्शन घडते.

• पाण्याची टाकी :

लेणी समूहाजवळ थोड्या बाजूला खडकात दोन पाण्याची टाकी खोदलेली होती. काळाच्या ओघात ती नष्ट होऊ लागलेली आहेत.

• गजपंथ सिद्धक्षेत्र मंदिर व संग्रहालय :

चामार लेणी / म्हसरूळ लेणी याविषयी माहिती  Chamar Leni / mhasrurl leni yavishyi mahiti Marathi madhe.

लेणी समुहा पाहून पुन्हा परतताना पायरी मार्ग संपल्यावर आपणास डोंगर पायथ्याला एक जैन मंदिर लागते. या ठिकाणी जैन धर्माच्या चोवीस तीर्थंकरांच्या दुर्मिळ मूर्ती पाहायला मिळतात. तसेच जैन धर्माचे धार्मिक संग्रहालय देखील येथे आहे. जैन धर्माच्या तीर्थंकरांच्या प्राचीन मूर्ती, कलाकुसरीच्या वस्तू , भुजपत्रे, हस्तलिखित पोथ्या, शिलालेख, ब्राँझ धातूच्या मूर्ती, शिलालेख, ताम्रपट, पहायला मिळतात.

चामार लेणी समुहा संबंधी ऐतिहासिक माहिती :

• जैन धर्म स्थापने पासून या परिसरात अनेक जैन मुनींचे वास्तव्य पूर्वीपासून होते.

• इसवी सनाच्या ११ व्या शतकात जैन धर्मीय दक्षिण भारतीय राजा गजपती सिद्धक्षेत्र चामराज नावाच्या राजाने येथे जैन मुनींसाठी तपश्चर्या, साधना करण्यासाठी हा लेणीसमूह खोदून तयार करून घेतला.

• या ठिकाणी जैन आचार्य कुंदकुंद देव यांचे वास्तव्य होते. त्यांनी लिहिलेल्या ग्रंथातून या जैन तीर्थक्षेत्राची माहिती समजते. रामचंद्र व बलराम यांच्या पूर्वी होऊन गेलेले सात बलभद्र या ठिकाणाहून मोक्ष प्राप्त मिळवून गेलेले आहेत.

• त्याबरोबर येथे हजार कालखंडात झालेले अनेक योगीराज यांना येथूनच मुक्ती मिळाली.

• बलभद्र यांच्या काळात येथून गजकुमार मुनिराज मोक्षास गेले. म्हणून या स्थानास गजपथ म्हंटले जाते.

• राष्ट्रकुट राजवटीत येथे राजा विरप्पदेव यांनी जैन धर्माची दिक्षा घेतली. आचार्य वीरसेन नावाने त्यांनी कार्य केले.

• आचार्य वीरसेन यांनी येथे चामार लेण्यात विद्याकेंद्र स्थापित केले.

• जैनाच्या नऊ बलभद्रा पैकी सात बलभद्र येथून वेगवेगळ्या तीर्थकारांच्या काळात मोक्ष प्राप्त करून गेले आहेत. अशी अख्यायिका ऐकिवात आहे.

• आजच्या काळात देखील अनेक योगीराज तसेच जैन मुनी येथे साधना करत असतात.

• अशी आहे चमार लेणी समूहाविषयी माहिती मराठी भाषेत.

• Chamar leni samuha vishyi mahiti marathi madhe

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

यह एक प्रायव्हेट वेबसाईट हैं l इसमें लिखी हुई जाणकारी के बारे में आप को आशंका हो तो सरकारी साईट को देखकर आप तसल्लई कर सकते हैं l

Vasai Fort (Bassein Fort) – Information in English

  Vasai Fort (Bassein Fort) – Information in English “Invincible fort Janjira, Vasai Fort too fought till unconsciousness, finally the front...