सुवर्णदुर्ग किल्ल्याची माहिती
Suvarndurg kilyachi mahit marathi madhe
• स्थान :
महाराष्ट्र राज्यातील कोकण विभागात असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील हर्णे या बंदरापासून समुद्रात आपणास सुवर्णदुर्ग हा किल्ला पहायला मिळतो. हा एक जलदुर्ग आहे.
• उंची :
जलदुर्ग असल्याने हा किल्ला समुद्र सपाटी पासून अंदाजे १४०० फूट उंचीवर हा किल्ला आहे. या किल्याची लांबी ४८० मीटर असून रुंदी १२३ मीटर आहे. एकूण चार ते पाच एकरात हा किल्ला एका बेटावर बांधलेला आहे.
• सुवर्णदुर्ग किल्ला पहायला जाण्यासाठी प्रवासी मार्ग :
• हर्णे एक बंदर असल्याने समुद्रमार्गे या किल्ल्यावर मुंबई , गोवा, रत्नागिरी व अन्य समुद्री ठिकाणावरून जाता येते.
![]() |
| हर्णे बंदर |
• रस्ते मार्गे जाण्यासाठी मुंबई – गोवा मार्गावरील खेड येथे आल्यावर तेथून दापोली येथे बसने यावे लागते. तेथून हर्णे गावी असलेल्या बंदरात बसने व खाजगी वाहनाने आल्यावर आपण हर्णे बंदरातील छोट्या नावेद्वारे सुवर्णदुर्ग किल्ल्यावर जाऊ शकतो.
• रेल्वे मार्गे कोकण रेल्वे ने आपण खेड – तेथून बसने दापोली – हर्णे बंदर तेथून – सुवर्णदुर्ग
• मुंबई येथून २२२ किलोमीटर अंतरावर सुवर्णदुर्ग आहे.
• पुणे येथून २०० किलोमीटर अंतरावर सुवर्णदुर्ग किल्ला आहे.
• मुंबई, पुणे, गोवा ही भारतातील आंतरराष्ट्रीय ठिकाणे आहेत.
• सुवर्णदुर्ग किल्ला हर्णे बंदराच्या सुरक्षेसाठी बांधला गेला होता. त्याच्या जोडीला जवळच संरक्षक कडे म्हणून गोवा गड, फत्ते गड व कनकदुर्ग बांधलेला आहे.
• सुवर्णदुर्ग किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे :
मुंबई – गोवा मार्गावरील खेड येथून आपण बस वा आपल्या खाजगी वाहनाने दापोली व तेथून हर्णे बंदरात जाऊन पोहोचल्यावर तिथे आपले वाहन पार्क करून धक्क्यावर जाऊ शकतो. तिथे खाजगी प्रवासी नौका आहेत. अंदाजे एका फेरीसाठी २०० रुपये आकार घेतात. जास्त थांबा असेल तर जादा आकार घेऊ शकतात. तेथून आपण वीस मिनिटात सुवर्णदुर्ग किल्ल्यावर जाऊन पोहोचतो. प्रवेशद्वार असलेल्या बाजूस उतरल्यावर आपणास पायी थोडं चालत प्रवेशद्वाराकडे जावे लागते. हा किल्ला एका बेटावर आहे. कातळ किनारा तेथून थोड अंतर सोडून तटबंदी असलेला हा किल्ला आहे.
• गोमुख बांधणी प्रवेशद्वार :
पायी चालत जेव्हा आपण दगडी पायरी मार्गानं किल्याच्या मुख्य द्वारापाशी येतो. तेव्हा गोमुख वळण रस्ता दोन बुरुजात लागतो. व आतील बाजूस आपणास विशाल महाद्वार पहायला मिळते. गोमुख बांधणी म्हणजे गाय वासराला दूध पाजताना मागे वळून पाहते तशी रचना. शत्रूच्या हल्ल्याच्या तोफ व सैन्य दलाच्या थेट हल्ल्यापासून संरक्षण होण्यासाठी अशी बांधणी दरवाजाची केली जाते. दरवाजा जवळ येताच आपल्या बाजूच्या बुरुजाच्या भिंतीवर हनुमंत शिल्प पाहायला मिळते. दरवाजा खाली पायऱ्या आहेत. ज्या असमान उंचीच्या आहेत. शत्रूचे सैन्य व घोडे वेगाने हालचाल करताना त्यांना अडचण येते. यासाठी अशी रचना केली जाई. तसेच बाजूला एक अस्पष्ट शिलालेख बाजूच्या बुरुजाच्या भिंतीत पहायला मिळतो. प्रवेशद्वार पूर्व दिशायुक्त उत्तराभिमुख आहे.
देवड्या :
महादरवाजा ओलांडून आत आल्यावर चौकटी मागील बाजूस आपणास एक आडना म्हणजेच दरवाजा बंद केल्यावर लावायची अडसर जागा दिसते. एका बाजूची देवडी लहान आहे. तर दुसऱ्या बाजूची विस्तृत स्वरूपाची आहे. जी पहारेकऱ्यांना राहण्यासाठी व विश्रांतीसाठी बनवली असल्याचे दिसून येते.
• पडक्या वाड्याचे अवशेष :
किल्याच्या आतील बाजूस आपल्याला पडलेल्या वाड्याचे अवशेष पाहायला मिळतात. आता तिथे फक्त चौथरे पाहायला मिळतात. तसेच राजवाड्याचे अवशेष पाहायला मिळतात.
• चौकोनी विहिरी :
किल्यात एके ठिकाणी आपल्याला एक बांधीव विहीर टाके दिसते. जे किल्यातील पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी तयार केले होते. हल्ली वापर नसल्याने पाणी पुष्कळ प्रमाणात शेवाळलेले पहायला मिळते.
• किल्याची भिंत, तटबंदी :
किल्याच्या सभोवती आपणास बांधलेली भक्कम तटबंदी अजूनही सुस्थितीत असलेली दिसते. कात्याळ खडकावर असणारी उंच अशी ही तटबंदी विस्तृत फिरण्यास सुंदर अशी आहे. भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी भिंतीपर्यंत येते. त्यामुळे तळाच्या दगडांची थोडक्यात झीज झालेली दिसून येते.
• चोर दरवाजा :
दुर्गाच्या पश्चिम तटाकडे आपणास एक भिंतीत उगवलेल्या विशाल वृक्षाच्या खाली एक छोटासा बांधीव गुप्त मार्ग पहायला मिळतो. जो किल्याबाहेर घेऊन जातो. ज्या ठिकाणी हा मार्ग बाहेर पडतो. तेथून खाली उतरण्यास एक रस्सी बांधलेली दिसून येते. येथून खाली उतरणे अवघड जाते. संकटकाळी तसेच रसद पोहोचवायची असल्यास या मार्गाचा उपयोग होत असे.
बुरुज :
किल्ल्याला ऐकून चोवीस बुरुज असल्याचे दिसून येतात. या बुरुजांची उंची जवळ जवळ तीस फूट असल्याचे दिसते. टेहळणी करण्यासाठी तसेच शत्रूवर हल्ला करण्यासाठी यांचा व सुरक्षेसाठी वापर केला जात असे.
• जंग्या आणि फांज्या :
गडावर जागोजागी बुरुजात जंग्या व फांज्या पहायला मिळतात. जंग्याचा वापर बंदूक अथवा बाणाने शत्रूचा लपून वेध घेण्यासाठी केला जात असे. तर फांजी ही तोफ मारा करण्यासाठी वापरली जात असे.
• तोफ :
किल्ल्यावर काही ठिकाणी तोफा पहायला मिळतात. ज्या काळाच्या ओघात नष्ट होऊ लागल्या आहेत. काहींचे फक्त अवशेष शिल्लक आहेत.
• देवालय :
किल्यावर सध्या एकही देऊळ नाही. पूर्वी कान्होजी आंग्रे यांची कुलदेवी कालंबिका येथे होती. पुढे हे मंदिर येथून हलवले गेले. असे स्थानिकांकडून समजते.
• धान्य कोठार :
किल्ल्यावर एका बाजूला एका अवशेष असलेल्या वास्तूचा हल्ली जीर्णोध्दार केल्याचे पाहायला मिळते. ही पूर्वी धान्य कोठार म्हणून जागा वापरली जात असावी.
• दारूगोळा कोठार :
धान्य कोठारा सारखीच चिऱ्याने आधुनिक काळात जीर्णोध्दार केलेली जांभी दगडाची आणखी एक वास्तू पहायला मिळते. ते दारूगोळा कोठार असावे. असे मानले जाते.
• सुवर्णदुर्ग किल्ल्याची ऐतिहासिक माहिती :
• हर्णे बंदर व त्याचे व्यापारी महत्व जाणून शिलाहार राजवटीच्या काळात येथे थोडे बांधकाम झाले.
• पुढे बहमनी सत्तेच्या ताब्यात हा प्रदेश होता.
• इसवी सनाच्या सोळाव्या शतकात पूर्वार्धात हा प्रदेश निजामशाहीत होता. तेव्हा तुरळक तटबंदी बांधली गेली.
• पुढे इसवी सन १६४० नंतर आदिलशाहीत हा किल्ला दाखल झाला.
• सतराव्या शतकात शिवरायांनी दर्या सारंग मायनाक भंडारी व सहकाऱ्यांनी हा किल्ला जिंकून स्वराज्यात आणला.
• इसवी सन १६५९ रोजी तुकोजी आंग्रे शिवरायांसोबत आले. कान्होजी आंग्रे याच सालांदरम्यान अंजनवेल या ठिकाणी रहात असत.
• इसवी सन १६७४ साली सुवर्णदुर्ग किल्ल्याची दुरुस्ती व गोमुख बांधणी दरवाजाची निर्मिती करण्यात आली.
• पुढे शिवराय यांच्या मृत्यूनंतर या ठिकाणी छत्रपती राजाराम महाराज यांच्या कारकीर्दीत अचलोजी मोहिते यांची किल्लेदार म्हणून नियुक्ती करण्यात आली.
• इसवी सन १६८८ रोजी मुघल सेनानी सिद्दी कासीम याने किल्ल्यास वेढा घातला. अचलोजी मोहिते फितूर झाला. कान्होजी आंग्रे यांच्या लक्षात आल्यावर कान्होजी नि त्यास ठार केले. व स्वतःच्या हाती सैन्यबळ घेऊन त्यांनी शत्रूवर हल्ला चढवला. तेव्हा कान्होजी शत्रूच्या ताब्यात सापडले. पण शिताफीने ते निसटले. व पोहत गडावर आले. पुन्हा गड त्यांनी लढवला. जून मध्ये कासिम याने वेढा उठवला. पुढे व शिवरायांनी कान्होजी आंग्रे यांना सर लष्कर किताब दिला. व सुवर्ण किल्यावर त्यांची नेमणूक केली
• मराठा गादी संघर्ष काळात मराठी आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे यांनी प्रथम ताराबाईची बाजू घेतली. नंतर ते इसवी सन १७१३ साला शाहू महाराज यांच्याकडे गेले.
• इसवी सनाच्या १७३१ पर्यंत मराठी आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे यांच्या नंतर सेखोजी आंग्रे यांनी सुवर्णदुर्ग किल्ल्याचा कारभार पाहिला.
• इसवी सन १७५५ मध्ये सुवर्णदुर्ग मराठी आरमार प्रमुख तुळाजी आंग्रे यांच्या ताब्यात किल्ला होता. त्यावेळी पेशवाईकडे मराठा सत्ता होती. पेशव्यांशी बिनसले त्यामुळे इंग्रजांच्या मदतीने पेशव्यांनी सुवर्णदुर्ग किल्ल्यावर हल्ला चढवला. पेशव्यांच्या रामजी पंत महादेव यांनी भू भागावरून तर इंग्रजांचा कमांडर जेम्स याने समुद्रमार्गे हल्ला चढवला. तोफेच्या माऱ्याने किल्ल्यावरील दारूगोळा कोठार उडाले. किल्ला लढविणे अवघड झाल्याने तुळाजी आंग्रे यांनी समुद्रमार्गे पलायन केले. व किल्ला जेम्सने पेशव्यांना दिला.
• इसवी सन १८०३ मध्ये सुवर्णदुर्ग किल्ल्यावर पेशवा दुसरा बाजीराव काही काळ राहिला होता.
• इसवी सन १८१८ सालात मराठा साम्राज्य लायस गेले. इंग्रजी अधिकारी जॉन केनडी याने सुवर्णदुर्ग किल्ला ताब्यात घेतला.
• पुढे १५ ऑगस्ट रोजी भारत स्वतंत्र झाल्यावर हा किल्ला स्वतंत्र भारत सरकारच्या ताब्यात आला.
• सध्या भारतीय पुरातत्व व महाराष्ट्र राज्य सरकारच्या अधीन हा किल्ला आहे. एक पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे.
• मराठी आरमाराचा सुवर्णकाळ या किल्ल्याने पहिला आहे. आजकाल या किल्याची थोडीफार डागडुजी केल्याचे दिसून येते. आजही सुस्थितीत हा किल्ला आहे.
• अशी आहे सुवर्णदुर्ग किल्ल्याची माहिती
Suvarndurg killyachi mahiti marathi madhe.



















कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
यह एक प्रायव्हेट वेबसाईट हैं l इसमें लिखी हुई जाणकारी के बारे में आप को आशंका हो तो सरकारी साईट को देखकर आप तसल्लई कर सकते हैं l