मंडणगड किल्याविषयी माहिती
Mandangad kilyavishyi mahiti
• स्थान :
महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यास शेवटी लागून असलेला रत्नागिरी जिल्यातील अतीउत्तरेकडील तालुका ठिकाण मंडणगड आहे. येथून जवळच चार किलोमीटर अंतरावर मंडणगड किल्ला आहे.
हा एक गिरीदुर्ग प्रकारचा किल्ला आहे.
• उंची :
सदर किल्ला हा उंच डोंगर पठारी असून याची पायथा उंची सरासरी ३०० मीटर इतकी आहे.
• किल्ल्याकडे जाण्यासाठी प्रवासी मार्ग :
• मुंबई गोवा हायवे वरील महाड येथून म्हप्रल मार्गे मंडणगडला जाता येते.
• मुंबई गोवा महामार्गावरील रत्नागिरी जिल्यातील खेड पासून - दापोली मार्गे – मंडणगडला जाऊ शकतो.
• समुद्र मार्गे बाणकोट खाडीतील वेळास बीच वरून आपण मंडणगडला जाऊ शकतो.
• मुंबई, रत्नागिरी ही मोठी शहरे येथून नजीकची महानगरे होत. ही रस्ते, लोहमार्ग, जलमार्ग याने जोडली गेली आहेत. तसेच मुंबई येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.
• मंडणगड किल्यावर पाहण्यायोग्य ठिकाणे :
महाड किंवा दापोली मार्गे तसेच वेळास बीच वरून रस्तेमार्गाने आपण मंडणगड या तालुक्याच्या गावी पोहोचतो. तेथून बस स्टँड पासून जाणाऱ्या मंडणगड रोडने आपण दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या धनगरवाडी येथून किल्यावर जाऊन पोहोचतो. किल्यावर गाडीमार्ग आहे. जो थेट किल्ल्यावरील गणेश मंदिरापर्यंत जातो.
गणेश मंदिर :
जुन्या चौथऱ्यावर नवीन बांधणी केलेले गणपती देवाचे मंदिर किल्यावर पहायला मिळते. बाह्य बाजूस लघु मंडप, खुला गाभारा असे स्वरूप या मंदिराचे आहे.
आतील बाजूस गणेश मूर्ती असून. मंदिराच्या वरील बाजूस कळस आहे. गणेश विघ्नहर्ता असल्याने संकट नाश करणारी देवता म्हणून किल्यावर पुजली जाते.
• विस्तृत तळे :
गणेश मंदिराशेजारी आपल्याला एक विस्तृत खोदीव पाण्याचे बारमाही पाणी असणारे तळे आहे. पूर्वीपासून ते गडावरील पिण्याच्या व खर्चाच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी बांधले गेले असावे.
• विस्तृत पठार व विहिर :
तळ्याच्या काठाने थोडे पुढे पाऊलवाटेने गेल्यावर आपल्याला विस्तृत जागा लागते. तिथे आपल्याला एका चौथऱ्यावर ठेवलेली तोफ पाहायला मिळते. ती मध्ययुगीन काळातील आहे. तसेच तोफेच्या शेजारी आपल्याला ध्वजस्तंभ पहायला मिळतो.
विहीर :
येथे जवळच एक विहीर आहे. ज्यामध्ये आजही पाणी आपल्याला मिळते.
• वाड्याचे अवशेष :
गडावर एके ठिकाणी आपल्याला वाड्याचे अवशेष पाहायला मिळतात. पायऱ्या व उंच ज्योते असलेली ही वास्तू पाहून तिच्या विशालतेचा अंदाज बांधता येतो. वरील छत व मातीचे बांधकाम नष्ट झाले आहे. ही एक सदर असावी असे वाटते.
• कबर :
वाड्याचे अवशेष पाहून थोडं पुढे गेल्यावर आपल्याला एक कबर पहायला मिळते. काहीजण म्हणतात की ती मराठे आरमार प्रमुख दर्यासारंग दौलतखान याची आहे. पण तिथे तशी लिखित माहिती मिळत नाही.
• नक्षीदार दगड :
या ठिकाणी एक नक्षीदार दगड पहायला मिळतो. तो कबरी सभोवती बाजूला असलेल्या वास्तूचा असावा असे वाटते. पण त्यावरील नक्काशी हिंदू धर्मीय शैलीतील वाटते.
• भग्न वाडे, वास्तू अवशेष :
कबर पाहून पुढे गेल्यावर आपल्याला पुढे अनेक भग्न वास्तू पहायला मिळतात. या शिबंदीत राहणाऱ्या अन्य गडकरी, मावळे तसेच इतर अधिकारी यांच्यासाठी बांधल्या गेल्या असल्याचे जाणवते. त्यांची रचना पाहिल्यावर त्यांचे मध्ययुगीन वैभव कसे असावे याची कल्पना येते.
• दुसरा तलाव :
गडाच्या पुढील एक टोकाला आपल्याला आणखी एक तलाव पाहता येतो. गणेश मंदिर तलावापेक्षा तो लहान वाटत असला. तरी पूर्वी विशाल असेल. काळाच्या ओघात दुर्लक्ष झाल्याने त्याची दुरावस्था झाल्याचे जाणवते.
• भग्न अवशेष :
या तलावा शेजारी देखील आपल्याला भग्न निवासी वास्तूचे अवशेष पाहायला मिळतात.
• तटबंदी व बुरुज :
काळाच्या ओघात दुर्लक्ष झाल्यामुळे तसेच उन, वारा, पाऊस, वनस्पती वाढ यांच्या माऱ्याने गडाची तटबंदी ढासळलेली दिसून येते. खाली फक्त भूमिगत अवशेष पाहायला मिळतात.
• गडावरून आजूबाजूचा सुंदर परिसर तसेच पश्चिम बाजूला असणारे तुळशी धरण पाणलोट क्षेत्र पाहता येते. खालील बाजूस असलेले मंडणगड गाव देखील पहाता येते. तसेच सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यांचे विलोभनीय दर्शन घडते.
• किल्ले भ्रमंतीवेळी अनेक वस्तू लागतात. त्या तुम्ही खालील वेबसाईटच्या आधारे पाहू शकता. खरेदी करू शकता.
• ट्रॅव्हल श्याक /Tripole Aur Trekking and Travel Rucksack
👉https://amzn.to/4rDgX2V
• ट्रेकिंग शूज/ Trekking shoes / Hiking shoes
👉 https://amzn.to/4uyIUeZ
• टोपी / Sun Cap / hat :
👉 https://amzn.to/4bRniDe
• कॅमेरा / Action Camera :
👉 https://amzn.to/4biTU90
• सेल्फी स्टिक/ Selfie stick. :
👉 https://amzn.to/4bGETNg
• बॅटरी/ LED Headlamp / Torch :
👉https://amzn.to/4bNNUoN
• रोहन दोरी /Climbing rope :
👉https://amzn.to/41bmO4P
• कॅरेबिनर हुक/ Carabiner Hooks :
👉 https://amzn.to/4uDMC7i
• फर्स्ट अँड कीट /First Aid kit :
👉https://amzn.to/4bx27VF
• कॅम्पिंग टेन्ट /Camping Tent :
👉https://amzn.to/47bm973
• झोपण्याची बॅग / Sleeping Bag :
👉 https://amzn.to/40IDYqn
• दुर्बीण /Telescope
👉 https://amzn.to/4snpwQS
• मंडणगड किल्याची ऐतिहासिक माहिती :
• हा किल्ला शिलाहार राजा भोज याने बांधला असावा असे मानले जाते.
• पुढे या परिसरात बहामनी सत्तेचे राज्य होते.
• पुढे बहामनी सत्तेच्या विभाजनाने हा किल्ला आदिलशाहीत दाखल झाला.
• आदिलशहाने आपले सरदार यशवंत दळवी याच्या ताब्यात हा किल्ला सोपवला. जो विशाळगड वेढ्यात सामील होत.
• इस १६६१ साली उंबरखिंड मार्गे स्वराज्यावर चालून आलेल्या कारतलबखान याचा पराभव करुन शिवराय जेव्हा दाभोळकडे निघाले. तेव्हा शिवराय चालून येत असल्याची बातमी समजताच दळवींनी गड सोडून शृंगारपूर गाठले. व अनायासे न लढाई करता गड स्वराज्यात दाखल झाला.
• इसवी सन १७३३ पर्यंत मराठा साम्राज्यात हा किल्ला होता.
• काही काळ सिद्ध्यांच्या ताब्यात हा किल्ला गेला.
• पुढे पुन्हा मराठा साम्राज्यात घेतला गेला.
• इसवी सन १८१८ साली मराठा साम्राज्याच्या अस्तानंतर ब्रिटिशांच्या ताब्यात हा किल्ला गेला.
• पुढे १५ ऑगस्ट १९४७ साली भारत स्वतंत्र झाल्यावर हा किल्ला स्वतंत्र भारत सरकारच्या ताब्यात आला.
• अशी आहे मंडणगड किल्याविषयी माहिती Mandangad kilyavishyi mahiti














कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
ही एक वैयक्तिक माहितीपर वेबसाईट आहे. येथे दिलेली माहिती अभ्यास व संदर्भासाठी आहे.
अधिकृत माहितीसाठी संबंधित सरकारी संकेतस्थळ पाहावे.