संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली / sanjay gandhi rastriy udyan borivali
स्थान :
महाराष्ट्र राज्यातील मुंबई शहरात जवळच मध्यभागी असलेले राष्ट्रीय अभयारण्य म्हणजे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान( SGNP) होय. हे मुंबई शहराच्या मध्यभागी वसलेले भारतातील एकमेव मोठे राष्ट्रीय उद्यान आहे. हे उद्यान निसर्ग, वन्यजीव आणि प्राचीन इतिहास यांचा अनोखा संगम दर्शवते.
हद्द :
या उद्यानाच्या उत्तर सीमेवर वसईची खाडी आहे. तर दक्षिण दिशेला विहार सरोवर आहे. पूर्वेला ठाणे शहर परिसर येतो. तर पश्चिमेस बोरिवली व कांदिवली हा मुंबई शहराचा भाग येतो.
बोरिवली (पूर्व व पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र
क्षेत्रफळ : जवळपास १०४ चौ. किलोमीटर एरियात हे उद्यान वसलेले आहे.
अभयारण्य पहायला जाण्यासाठी प्रवासी मार्ग :
मुंबई हे आंतरराष्ट्रीय ठिकाण रस्ते, लोहमार्ग, हवाईमार्गाने जोडले गेले आहे.
• बोरिवली लोकलने बोरिवली स्टेशनवर उतरून तेथून लगेच दहा मिनिटाच्या अंतरावर उद्यान गेट आहे.
• ठाणे, मुंबई, परिसरातील तसेच बाहेरील लोक आपल्या खाजगी वाहन, बस, व इतर वाहनाने बोरिवली येथे नॅशनल पार्क येथे येऊ शकतात.
• कसे जायचे?
• रेल्वे : बोरिवली स्टेशन (पश्चिम) – तिथून रिक्षा/बस
• बस : BEST बसेस उपलब्ध
• खाजगी वाहन : वेस्टर्न एक्सप्रेस हायवेने सहज प्रवेश
• संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये पाहण्यासारखी पर्यटन स्थळे :
बोरिवली येथे आपण अभयारण्य परिसरात आल्यावर आपण प्रवेश गेट जवळ येतो. तेथे आल्यावर प्रवेश तिकीट काढून आपण उद्यानांत येऊ शकतो. अभयारण्य सफरीसाठी येथे आपल्याला भाड्याने सायकल मिळू शकते. तसेच येथे स्थानिक मिनी ट्राय ट्रेन देखील आहे. तिला वनराणी असे नाव दिलेले आहे. यामध्ये तिकीट काढून आपण अभयारण्य सफरीचा आनंद घेऊ शकतो.
• मंगलवन / वेलावण :
वसई खाडीला उल्हास नदीच्या भागात लागून असलेला खारफुटी जंगलाचा भाग हा मंगलवन / वेलावण या नावाने ओळखला जातो. या ठिकाणी अविसेनिया (Avicennia) – श्वसनामुळे (हवेतील ऑक्सिजन घेण्यासाठी) असलेले वृक्ष
रायझोफोरा (Rhizophora) – खांबासारखी आधारमुळे (stilt roots), सोननेरशिया (Sonneratia) – दलदलीत टिकणारे मोठे वृक्ष, ब्रुगिएरा (Bruguiera) – लांब मुळे व दाट पर्णसंभार
कंदेल / कॅंडेलिया (Kandelia) – किनारी भागात आढळणारे वृक्ष आढळतात.
पक्षी – बगळा, करकोचा, बक, किंगफिशर इ.मासे – खारफुटी ही माशांची नर्सरी मानली जाते
कोळंबी (Shrimp/Prawn),खेकडे (Crabs),शिंपले, ऑयस्टर, मडस्किपर (चिखलावर चालणारा मासा) या परिसरात आढळतो.
• मध्य जंगलाचा भाग : या अरण्याच्या मध्य भागात घनदाट जंगल आहे. येथे विशेषत साग (Teak), करंज, बोर, बाभूळ, निवडुंग, बांबू,जांभूळ, कडुलिंब , शिसव. यासारख्या सदाहरित व निमसदाहारित जंगलात आढळणारे निरनिराळे वृक्ष येथे पहायला मिळतात. ३०० पेक्षा जास्त प्रजातीचे निरनिराळे वृक्ष व वनस्पती येथे आहेत. बऱ्याच नवीन वनस्पतींची लागवड केलेली पहायला मिळते. त्यातील काही औषधी देखील आहेत. दहिसर नदी व तिच्या लहान ओढे, नाले, व नद्या या अभयारण्याच्या जीवनदायिनी आहेत.
• प्राणी :
येथील जंगलात मुंगूस, उदमांजर, रानमांजर, अस्वल, लंगुर, काळवीट, हरणे, सांबर, चितळ, रानडुक्कर, बिबट्या, माकडे, या सारखे प्राणी येथे पहायला मिळतात. बिबट्या येथील मोठ्या प्राण्यात गणला जातो. येथे २७४ प्रजाती पहायला मिळतात. त्यातील ४० प्रकारचे सस्तन प्राणी आहेत.
• सरीसृप प्राणी :
साप, पाल, सरडे, नाग,अजगर, घोरपड या प्रकारचे ३५ प्रकारचे सरीसृप प्राणी येथे पहायला मिळतात.
• उभयचर :
खाडी व इतर अंतर्गत नदीच्या खोऱ्यात अनेक उभयचर पहायला मिळतात. यामध्ये बेडूक, खेकडे यासारखे ७८ प्रकारचे उभयचर प्राणी आहेत.
• फुलपाखरे :
अरण्यात ७० पेक्षा जास्त प्रजातीची फुलपाखरे पहायला मिळतात.
• पक्षी : मोर, सुतार, किंगफिशर, घार यासारखे अनेक स्थलांतरित पक्षी येथे पहायला मिळतात.
• धबधबे / जलप्रपात :
अभयारण्यारण्य परिसरात अनेक उंच भागातून जलप्रवाह वाहतात त्यामध्ये जागोजागी धबधबे निर्माण झालेले आहेत. यामध्ये कोकणीपाडा, येऊर, चिरमादेवी, नॅशनलपार्क, वाघदेवी हे धबधबे अभयारण्य परिसरात पहायला मिळतात.
• पाणवठे :
जंगलाच्या उंच भागातून अनेक पाणवठे व झरे पहायला मिळतात. यामध्ये मध्यभागी असलेले तुळशी सरोवर, दक्षिण बाजूस असलेला विहार लेक, त्याखालील पवई लेक, मध्यभागी अनेक लहानमोठे पाझर बांधलेले आहेत. काही कृत्रिम पाणवठे निर्माण केलेले आहेत. जंगलातून वाहणाऱ्या नदी भागात कृत्रिम बांध घालून पाणवठे निर्माण केलेले आहेत.दहिसर नदी व उल्हास नदीच्या उपनद्या या अभयारण्याच्या जीवनदायिनी आहेआहेत.
• बोटिंग पॉईंट :
बोरिवली गेट पासून थोड आत आल्यावर तिथे काही अंतरावर आपल्याला कृत्रिम पाणवठा केलेला दिसून येतो. यामध्ये बोटिंग सफरीचा आनंद घेता येतो.
• डियर निरीक्षण झोन :
अभयारण्य परिसरात दहिसर नदीच्या परिसरात आपल्याला हरणे पाहायला मिळतात. हा प्रदेश घनदाट जंगलाच्या परिसरात येतो.
• कान्हेरी लेणी :
अभयारण्याच्या मध्य भागात आपणास कान्हेरी लेणी पाहायला मिळतात. बोरिवली गेटद्वारे अनेक बसेस या ठिकाणी येतात.
कान्हेरी लेणी ही मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात स्थित प्राचीन बौद्ध लेणी आहेत.
ही लेणी इ.स.पूर्व पहिल्या शतकापासून इ.स. दहाव्या शतकापर्यंतच्या काळातील आहेत.
येथे ऐकूण सुमारे १०९ लेणी असून त्यामध्ये विहार, चैत्यगृह आणि स्तूप पाहायला मिळतात.
ही लेणी भिक्षूंनी ध्यान, निवास व शिक्षणासाठी वापरली होती.
खडकात कोरलेली स्थापत्यशैली, शिलालेख व जलसाठ्याची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे.
इतिहास, धर्म आणि निसर्ग यांचा सुंदर संगम येथे अनुभवता येतो.
• सूर्योदय पॉईंट :
कान्हेरी लेणी समूहापासून जवळच आपल्याला सूर्योदय पॉईंट आहे. येथे रोज सकाळी सुंदर सूर्योदयाचे दर्शन घेता येते. अनेक पर्यटक व निसर्ग सौंदर्य आस्वादक तिथे भेट देत असतात.
• ब्रिटिश कालीन बंगल्याचे अवशेष :
इंग्रजांच्या राजवटीत या ठिकाणी ब्रिटिश अधिकाऱ्याच्या राहण्यासाठी व विरंगुळ्यासाठी या अरण्यात असलेल्या तुळशी सरोवराजवळ जंगलात एक सुंदर बंगला बांधलेला होता. आता तो एक दुर्लक्षित वास्तू आहे. तिचे अवशेष पाहायला मिळतात.
• टायगर झोन नॅशनल पार्क :
उद्यानाचा मध्यवर्ती भाग घनदाट अरण्याचा आहे. हे अरण्याचे गाभाक्षेत्र आहे. या परिसरात जाण्यास बंदी आहे. हे प्राणी रिझर्व्ह क्षेत्र आहे. या परिसरात बिबट्या सारखे प्राणी आढळून येतात.
• मुंडी पॉईंट :
अभयारण्य परिसरात उत्तर ईशान्य बाजूस मुंडी पॉईंट आहे. या परिसरात पाणवठे आहेत. अनेक प्राणी व पक्षी निरीक्षक या ठिकाणी निरीक्षण व अभ्यास करण्यासाठी येत असतात.
• पाणखंड धरण :
अभयारण्य परिसरात उत्तर ईशान्य बाजूस आपल्याला वाहणार्या लहान अरण्य नदी प्रवाहावर पाणखंड धरण बांधलेले पहायला मिळते. अरण्य प्राणी व पक्षी यांच्या साठी हे एक वरदान आहे.
भेट देण्याची वेळ
सकाळी 7:30 ते संध्याकाळी 6:30 (हंगामानुसार बदल होऊ शकतो)
सोमवारी बंद
महत्त्व
मुंबईसारख्या महानगरात हिरवे फुफ्फुस (Green Lung)
पर्यावरण संवर्धन, संशोधन व पर्यटनासाठी अत्यंत महत्त्वाचे
• संजय गांधी राष्ट्रीय उद्यान विषयी ऐतिहासिक माहिती :
• पूर्वी हा प्रदेश घनदाट जंगलाचा म्हणून ओळखला जात होता.
• इ.स.पू. 1 ते इ.स. 10 व्या शतकातील बौद्ध लेणी खोदली गेली.
• ब्रिटिश राजवटीत वन विभाग स्थापन झाल्यावर येथील २०.२६ चौ. किलोमीटर विभाग अभयारण्य परिसर वन विभागाच्या ताब्यात अंकित करण्यात आला.
• अभयारण्य परिसर निरीक्षण करण्यासाठी तसेच देखरेख करण्यासाठी बंगलीचे बांधकाम करण्यात आले.
• पुढे येथील काळया बेसाल्ट खडकामुळे या प्रदेशाचे नाव कृष्णगिरी ठेवण्यात आले.
• पुढे इ.स.१९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाल्यावर हा प्रदेश स्वतंत्र भारत सरकारच्या ताब्यात आला.
• इसवी सन १९७४ साली या उद्यानाचे नाव बोरिवली राष्ट्रीय उद्यान असे ठेवण्यात आले.
• इसवी सन १९८१ साली याचे नामांतर करुन संजय गांधी राष्ट्रीय उद्यान असे ठेवण्यात आले.
• अशी आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान विषयी ऐतिहासिक माहिती.
• Sanjay gandhi rastriy udyan borivali mumbai.







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
ही एक वैयक्तिक माहितीपर वेबसाईट आहे. येथे दिलेली माहिती अभ्यास व संदर्भासाठी आहे.
अधिकृत माहितीसाठी संबंधित सरकारी संकेतस्थळ पाहावे.