crossorigin='anonymous' src='https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-1553308877182847'/> महाराष्ट्र किल्ले व स्थळे यांची माहिती Forts and places in maharashtra: गोवळकोट / गोविंदगड किल्ल्याची माहिती (Govalkot / Govindgad Fort Information in Marathi)

बुधवार, ११ फेब्रुवारी, २०२६

गोवळकोट / गोविंदगड किल्ल्याची माहिती (Govalkot / Govindgad Fort Information in Marathi)

गोवळकोट / गोविंदगड किल्ल्याची माहिती
(Govalkot / Govindgad Fort Information in Marathi)

गोवळकोट / गोविंदगड किल्ल्याची माहिती  (Govalkot / Govindgad Fort Information in Marathi)

• स्थान

गोवळकोट किल्ला (Govalkot Fort), ज्याला गोविंदगड असेही म्हणतात, हा किल्ला चिपळूण (Chiplun) जवळ वाशिष्ठी नदीच्या काठावर, रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र येथे वसलेला आहे.

गोवळकोट किल्ल्याकडे जाण्याचे प्रवासी मार्ग

गोवळकोट / गोविंदगड किल्ल्याची माहिती  (Govalkot / Govindgad Fort Information in Marathi)

मुंबईहून मुंबई–गोवा महामार्गाने चिपळूण शहर गाठावे.

चिपळूण येथील मध्यवर्ती बसस्थानकापासून सुमारे २ ते ३ किलोमीटर अंतरावर गोवळकोट / गोविंदगड किल्ला आहे.

गोवा या आंतरराष्ट्रीय ठिकाणाहून देखील मुंबई रोडने चिपळूणजवळून येथे जाता येते.

किल्ले भ्रमंतीवेळी अनेक वस्तू लागतात. त्या तुम्ही खालील वेबसाईटच्या आधारे पाहू शकता. खरेदी करू शकता.

• ट्रॅव्हल श्याक /Tripole Aur Trekking and Travel Rucksack

👉https://amzn.to/4rDgX2V

• ट्रेकिंग शूज/ Trekking shoes / Hiking shoes

👉 https://amzn.to/4uyIUeZ

• टोपी / Sun Cap / hat :

👉 https://amzn.to/4bRniDe

• कॅमेरा / Action Camera :

👉 https://amzn.to/4biTU90

• सेल्फी स्टिक/ Selfie stick. :

👉 https://amzn.to/4bGETNg

• बॅटरी/ LED Headlamp / Torch :

👉https://amzn.to/4bNNUoN

• रोहन दोरी /Climbing rope :

👉https://amzn.to/41bmO4P

• कॅरेबिनर हुक/ Carabiner Hooks :

👉 https://amzn.to/4uDMC7i

• फर्स्ट अँड कीट /First Aid kit :

👉https://amzn.to/4bx27VF

• कॅम्पिंग टेन्ट /Camping Tent :

👉https://amzn.to/47bm973

• झोपण्याची बॅग / Sleeping Bag :

👉 https://amzn.to/40IDYqn

गोवळकोट / गोविंदगड किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे

गोवळकोट / गोविंदगड किल्ल्याची माहिती  (Govalkot / Govindgad Fort Information in Marathi)

महाराष्ट्र राज्यातील कोकण विभागातील रत्नागिरी जिल्ह्यात, चिपळूण शहरापासून २ ते ३ किलोमीटर अंतरावर गोवळकोट गावाजवळ गोविंदगड म्हणजेच गोवळकोट किल्ला आहे.

गोवळकोट येथे आल्यावर किल्ल्यावर जाण्यासाठी दोन मार्ग उपलब्ध आहेत :

1. पायरी मार्ग

करंजेश्वरी देवीच्या मंदिराच्या मागील बाजूने पायऱ्यांचा मार्ग आहे.

सुमारे ३०० ते ३५० पायऱ्या चढून प्रवेशद्वाराजवळ जाता येते.

2. गाडी मार्ग

गाडीने थेट किल्ल्यावर जाता येणारा रस्ता उपलब्ध आहे.

• तटबंदी

गोवळकोट / गोविंदगड किल्ल्याची माहिती  (Govalkot / Govindgad Fort Information in Marathi)

गोवळकोट / गोविंदगड किल्ल्याची माहिती  (Govalkot / Govindgad Fort Information in Marathi)

किल्ल्याची बरीचशी तटबंदी ढासळलेली आहे. काही ठिकाणी ती पूर्णपणे पडलेली आहे. तटबंदीत काही ठिकाणी जंग्या पाहायला मिळतात.

• बुरुज

गोवळकोट / गोविंदगड किल्ल्याची माहिती  (Govalkot / Govindgad Fort Information in Marathi)

गोवळकोट / गोविंदगड किल्ल्याची माहिती  (Govalkot / Govindgad Fort Information in Marathi)

किल्ल्याच्या कमकुवत बाजू मजबूत करण्यासाठी अर्धचंद्राकृती किंवा पूर्ण चंद्राकृती वळण रचनेची बांधकाम प्रणाली म्हणजे बुरुज.

बरेच बुरुज ढासळलेले आहेत.

काही बुरुज अजूनही सुस्थितीत आहेत.

किल्ल्याच्या पश्चिमेस तीन व पूर्वेस दोन बुरुज आहेत.

बुरुजांमध्ये जंग्या व फांज्या आढळतात.

जंग्या – बारीक निशाण साधण्यासाठी असलेली छिद्रे

फांज्या – तोफा डागण्यासाठी केलेली रचना

• प्रवेशद्वार

गोवळकोट / गोविंदगड किले की जानकारी  (Govalkot / Govindgad Fort Information in Hindi)

किल्ल्याची प्रवेशद्वारे ढासळलेली असून आजूबाजूला अवशेष दिसतात. अवशेषांवरून प्रवेशद्वारांची रचना लक्षात येते. इतर किल्ल्यांप्रमाणेच येथेही दरवाजामागील पहारेकरी देवड्यांचे अवशेष पाहायला मिळतात. भिंतीतील अडसरावरून दरवाजाची रचना ओळखता येते.

• सदर

गोवळकोट / गोविंदगड किल्ल्याची माहिती  (Govalkot / Govindgad Fort Information in Marathi)

गोवळकोट / गोविंदगड किल्ल्याची माहिती  (Govalkot / Govindgad Fort Information in Marathi)

किल्ल्याच्या मध्यभागी उंच जोतीवर उभारलेल्या वास्तूचे अवशेष दिसतात. येथे सरकारी कागदपत्रांचे लेखणी व्यवहार तसेच मुख्य अधिकाऱ्यांच्या सभा होत असत. मध्ययुगीन काळात अशा वास्तूला सदर म्हणत.

• इतर बांधकाम अवशेष

गोवळकोट / गोविंदगड किल्ल्याची माहिती  (Govalkot / Govindgad Fort Information in Marathi)

किल्ल्यावर अनेक भग्न इमारतींचे चौथरे दिसतात. हे किल्ल्यावर राहणाऱ्या शिबंदी व इतर लोकांसाठी बांधलेल्या इमारतींचे अवशेष आहेत.

• पाण्याचे टाके

गोवळकोट / गोविंदगड किल्ल्याची माहिती  (Govalkot / Govindgad Fort Information in Marathi)

सदरजवळ एक सुमारे २० फूट खोल पाण्याचे टाके आहे. अंतर्गत गळतीमुळे हे टाके सध्या कोरडे आहे. टाक्यात उतरण्यासाठी पायरीमार्ग आहे. किल्ल्यावरील पाण्याची गरज भागवण्यासाठी हे टाके खोदले गेले असावे.

• तोफा

गोवळकोट / गोविंदगड किल्ल्याची माहिती  (Govalkot / Govindgad Fort Information in Marathi)

किल्ल्यावर एका चौथऱ्यावर एकूण ११ तोफा दिसतात. मूळतः येथे २१ तोफा होत्या.

काही तोफा खाली वाहणाऱ्या वाशिष्ठी नदीच्या काठावर, बोटी बांधण्यासाठी (जेटी म्हणून) रोवलेल्या आहेत.

एक-दोन तोफा बुरुजांवर ठेवलेल्या आढळतात.

गोवळकोट / गोविंदगड किल्ल्याची माहिती  (Govalkot / Govindgad Fort Information in Marathi)

• बांगडी तोफ

किल्ल्यावर बांगडीसारख्या रचनेची एक तोफ आहे. ती बांगडी तोफ म्हणून ओळखली जाते. ही तोफ दूरवर वर्तुळाकार फिरत गोळ्यांचा मारा करत असे.

• सरळ तोफ

सरळ तोफेचा आकार जितका मोठा, तितका ती गोळा अधिक दूर फेकते.

• विदेशी तोफा

किल्ल्यावर दोन विदेशी बांधणीच्या तोफा आढळतात. त्या कदाचित युद्धात शत्रूकडून ताब्यात घेतलेल्या किंवा खरेदी केलेल्या असाव्यात.

• चुन्याची घाणी

गोवळकोट / गोविंदगड किल्ल्याची माहिती  (Govalkot / Govindgad Fort Information in Marathi)

मध्ययुगीन काळात बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या चुन्याच्या निर्मितीसाठी चुन्याच्या घाणी केल्या जात. त्यांच्या वर्तुळाकार रचना आजही दिसतात. दगडी चाक मात्र दिसून येत नाही. किल्ल्याच्या तटबंदी व इमारती बांधण्यासाठी चूना वापरला जात असे.

• रेडजाई मंदिर

गोवळकोट / गोविंदगड किल्ल्याची माहिती  (Govalkot / Govindgad Fort Information in Marathi)

गोवळकोट / गोविंदगड किल्ल्याची माहिती  (Govalkot / Govindgad Fort Information in Marathi)

किल्ल्याच्या दक्षिणेकडील बुरुजाजवळ तटबंदीच्या शेजारी रेडजाई गडदेवतेचे लहान, जीर्णोद्धार केलेले मंदिर आहे. बाहेर सभामंडप असून आत देवीची मूर्ती आहे.

• बालेकिल्ला चौथरा

गोवळकोट / गोविंदगड किल्ल्याची माहिती  (Govalkot / Govindgad Fort Information in Marathi)

किल्ल्याच्या आत एक उंच टेकडीसारखी जागा आहे. येथून सर्व परिसरावर लक्ष ठेवता येते. ही जागा बालेकिल्ला म्हणून ओळखली जाते. येथे तटबंदी व इतर अवशेष दिसतात.

• उत्तर तटबंदी व विलोभनीय वाशिष्ठी नदीचे दर्शन

उत्तर बाजूस भग्न तटबंदी व काही सुस्थितीत असलेले बुरुज दिसतात. येथून विस्तीर्ण वाशिष्ठी नदी, तिला मिळणाऱ्या लहान नद्यांचा संगम आणि नालाकृती वळणांचे अतिशय सुंदर दृश्य दिसते.

गोवळकोट / गोविंदगड किल्ल्याची माहिती  (Govalkot / Govindgad Fort Information in Marathi)

गोवळकोट / गोविंदगड किल्ल्याची माहिती  (Govalkot / Govindgad Fort Information in Marathi)

गोवळकोट / गोविंदगड किल्ल्याची ऐतिहासिक माहिती

या किल्ल्याची स्थापना कोणी केली हे निश्चितपणे ज्ञात नाही.

या भागात शालिवाहन राजे किंवा इतर राजवटींच्या काळात किल्ल्यांची बांधणी झाली असावी, असे मानले जाते.

वाशिष्ठी नदी पुढे दाभोळ येथे मिळते. दाभोळ हे ऐतिहासिक बंदर होते.

व्यापाराच्या सुरक्षेसाठी व देखरेखीकरिता अंजनवेलचा गोपाळगड व चिपळूण परिसरातील गोवळकोट किल्ला बांधला गेला असावा.

पुढे या परिसरावर बहामनी सत्ता होती.

नंतर हा प्रदेश आदिलशाहीच्या ताब्यात गेला.

इ.स. १६६० मध्ये कोकण जिंकल्यानंतर गोपाळगड व गोवळकोट किल्ला स्वराज्यात सामील झाला.

संभाजी महाराजांच्या कारकीर्दीत औरंगजेबाच्या सांगण्यावरून सिद्दीने हल्ला करून किल्ला ताब्यात घेतला.

पुढे मराठा सरदार रामचंद्र हरी पटवर्धन यांनी किल्ला स्वराज्यात जिंकून घेतला.

इ.स. १६९९ मध्ये राजाराम महाराज करंजेश्वरी देवीच्या दर्शनासाठी येथे आल्याचे उल्लेख आहेत.

नंतर किल्ला पुन्हा सिद्दीच्या ताब्यात गेला.

किल्ला सोडवण्यासाठी ताराबाईंनी ७००० फौज पाठवली, मात्र युद्धकाळातील गोंधळामुळे किल्ला ताब्यात घेता आला नाही.

इ.स. १७३३ मध्ये राजर्षी शाहू महाराजांनी पंत प्रतिनिधी व बाजीराव पेशव्यांना किल्ला जिंकण्यासाठी पाठवले, मात्र समन्वय नसल्याने यश आले नाही.

इ.स. १७४५ मध्ये दर्यासारंग तुळाजी आंग्रे यांनी किल्ला जिंकून स्वराज्यात सामील केला.

इ.स. १८१८ मध्ये मराठा साम्राज्याच्या अस्तानंतर किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात गेला व त्यांनी किल्ल्याची मोडतोड केली.

१५ ऑगस्ट १९४७ रोजी किल्ला स्वतंत्र भारत सरकारच्या ताब्यात आला.

सध्या हा किल्ला चिपळूणजवळील एक महत्त्वाचे ऐतिहासिक पर्यटनस्थळ आहे. त्याची योग्य डागडुजी करणे आवश्यक आहे.

गोवळकोट / गोविंदगड किल्ल्याची माहिती  (Govalkot / Govindgad Fort Information in Marathi)

✨ अशी आहे गोवळकोट / गोविंदगड किल्ल्याची सविस्तर माहिती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ही एक वैयक्तिक माहितीपर वेबसाईट आहे. येथे दिलेली माहिती अभ्यास व संदर्भासाठी आहे.
अधिकृत माहितीसाठी संबंधित सरकारी संकेतस्थळ पाहावे.

कुडे लेणी/ kude leni

  कुडे लेणी/ kude leni स्थान :  महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यात रोहा तालुक्यात कुडा लेणी आहेत. इंदापूर पासून मुरुड जंजीरा मार्गावर आ...